Download App

Pune Crime : मुलीच्या प्रियकराच्या साथीने पत्नीने पतीला संपवलं; पेट्रोल टाकत जाळला मृतदेह, वेबसिरीज पाहून केलं प्लॅनिंग

Pune Crime : गेल्या काही दिवसांमध्ये राज्य आणि देशात नात्यांना काळिमा फासणाऱ्या घटनांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कधी आई मुला-मुलींचा खून करते. कधी मुलगा वडिलांचा खून करतो. तर कधी प्रियकर प्रेयसीला संपवतो कधी पत्नीच पतीला मारते. अशा घटनांमध्ये झालेली वाढ पाहता खरचं एवढी क्रुरता का वाढली आहे? असा प्रश्न उपस्थित होतो. ( Wife kill husband with help of Daughters lover planed murder by watching Crime web series )

Crime : उत्तर प्रदेशातून लातूरात आणत 11 वर्षीय तरुणीवर अत्याचार, दोन वर्षांपासून होती बेपत्ता…

अशीच एक पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुणे या विद्येचं माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या शहरात घडली आहे. या घटनेमध्ये एका महिलेने आपल्या मुलीच्या अल्पवयीन प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीचा खून केला आहे. जॅाय लोबो असं या मृत पतीचं नाव आहे. तर शिक्रापूर पोलिसांनी या महिलेच्या मुलीचा प्रियकर ॲग्नेल कसबे या अल्पवयीन मुलाला आणि पत्नी सॅन्ड्रा लोबोला अटक केली आहे.

Nashik Crime : मुलीचं अपहरण करणाऱ्याच्या घराबाहेरच आई-वडिलांवर अंत्यसंस्कार

खूनाचं नेमकं कारण काय?

या महिलेने आपल्या मुलीचं प्रेम प्रकरण लपवण्यासाठी तसेच स्वतःचे प्रेम संबंधामध्ये अडथळा येऊ नये यासाठी मुलीच्या प्रियकराच्या मदतीने हा खून केला. सॅन्ड्रा लोबो आणि जॅाय लोबो यांचा 17 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगी होती. या मुलीच अफेर असल्याचं कळताच जॉयने या तिघांना देखील मारहाण केली होती.

घटना नेमकी काय आहे?

ही महिला आणि तिची मुलगी नेहमीच क्राईम वेबस्टोरी पाहायच्या. यातूनच त्यांनी या हत्येचा कट रचला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आला. तर ही महिला नातेवाईकांना संशय येऊ नये म्हणून रोज त्याच्या फोनवरून स्टेटस अपडेट करत होती. तर चाकूने खून केल्यानंतर त्यांनी हा मृतदेह एक दिवस घरातच ठेवला व दुसऱ्या दिवशी रात्री सणसवाडीला नेऊन पेट्रोल टाकून पेटवून दिला. आपल्या सुखासाठी पतीला संपवलं मात्र आता या हि महिला आणि मुलीसह तिचा प्रियकर यांना आता जेलमध्ये खितपत पडावं लागणार हेच खरं.

Tags

follow us