Crime : उत्तर प्रदेशातून लातूरात आणत 11 वर्षीय तरुणीवर अत्याचार, दोन वर्षांपासून होती बेपत्ता…

Crime : उत्तर प्रदेशातून लातूरात आणत 11 वर्षीय तरुणीवर अत्याचार, दोन वर्षांपासून होती बेपत्ता…

उत्तर प्रदेशातून 11 वर्षीय अल्पवयीन मुलीला थेट महाराष्ट्रातील लातूरमध्ये आणून तिच्यावर दोन वर्ष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपीने पीडीत मुलीशी फेसबुकवर मैत्री करुन तिला पळवून आणले. त्यानंतर पीडित मुलीवर अत्याचार केले. दरम्यान, दोन वर्षांनतर पोलिसांना आरोपीसह पीडित मुलीचा शोध घेण्यात यश आले आहेत.

‘भाजपात एक ना धड भाराभर चिंध्या, तिकडे आधी पहा’; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

नेमकं प्रकरण काय?
एका युवकाने फेसबुकच्या माध्यमातून 11 वर्षीय तरुणीशी पहिल्यांदा मैत्री केली. त्यानंतर दोघांचे प्रेमसंबंध जुळले त्याचाच फायदा घेत युवकाने मुलीला फूस लावून महाराष्ट्रातील लातूरात आणले.

मुलगी बेपत्ता असल्याचं समजताच कुटुंबियांनी शोध घेतला. दरम्यान, मुलीच्या खोलीतून एका कागदावर दोन फोन नंबर लिहिल्याचं आढळून आलं. मिळालेल्या नंबरवर कुटुंबियांनी फोन केला असता या युवकाने कुटुंबियांनी धमकी दिली.

Devendra Fadnavis : मुहूर्त निघाला अन् फडणवीसांनी शिवतीर्थ गाठलं; ‘राज’ भेटीत रंगला गप्पांचा फड

कुटुंबियांशी झालेल्या संभाषणात आरोपी युवकाने आपले नाव शेख असे सांगून हैदराबाद येथून बोलत असल्याचे सांगितले. मुलगी आपल्यासोबत असून ती परत येणार नाही. एवढचं नाहीतर आरोपीने मुलीच्या वडिलांना आपल्या मुलीला विसरून जा, अन्यथा वाईट परिणाम होतील, अशी धमकीही दिली.

आरोपीच्या धमकीनंतर मुलीचे कुटुंबियांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी युवकाचा शोध घेतला. युवकाचं ठिकाण महाराष्ट्रातील लातून इथलं असल्याचं तपासात उघड झालं.

साई सुदर्शनची धुवांधार बॅटींग, सीएसकेसमोर 215 धावांचा डोंगर

तेव्हापासून तब्बल दोन वर्ष पोलिस युवकाचा शोध घेत होते. मात्र, त्याचा तपास लागत नव्हता. अखेर पोलिसांनी त्याचा शोध लावला. पोलिसांनी दस्तगीर शेख याला लातूरच्या बदुरे गावातून अटक केली. त्याच्या तावडीत असलेली पीडित तरुणीची सुटका करण्यात आली.

तरुणीने दिलेल्या जबाबात आरोपीसोबत दोन वर्षे अत्याचार केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन आरोपी दस्तगीर शेख याच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube