Download App

राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होणार? देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होणार असल्याचं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

महावसुली सरकारने मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लंय, देवेंद्र फडणवीसांचा आरोप…

पुढील आठ दिवसांत राज्यात भाजमध्ये मोठे बदल होणार असल्याची शक्यता आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीमध्ये बदल होणार असल्याचंही दिसून येत आहे. त्याचबरोबर राज्यातील जिल्हाध्यक्षांसह, शहराध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 18 रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. जे.पी. नड्डा पुणे दौऱ्यावर येणार पुणे भाजपमध्येही काही बदल होणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात बोलली जात आहे. नड्डा महाराष्ट्रात येणार असल्याने भाजपमध्ये नेमक्या गोष्टी बदलणार आहेत. भाजपची प्रदेश कार्यकारिणीमध्ये काही बदल होणार का? या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात असून पुढील आठ दिवसांनंतर स्पष्ट होणार आहे.

भरत गोगावलेंची नियुक्ती केव्हाही करु शकतो, लंडनहून परतताच राहुल नार्वेकरांचं मोठं विधान

पुणे दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी एक पुस्तक प्रकाशन सोहळ्यालाही हजेरी लावली आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत. फडणवीस म्हणाले, सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्मला आलो नाही संघर्ष करणे हाच आमचा डीएनए असल्याचं फडणवीसांनी ठणकावून सांगितलं आहे.

तसेच कोविड काळातील भ्रष्टाचाराच्या कहाण्या तर खूप सुरस आहेत. त्यामुळे हे अशा प्रकारचं सरकार घालवणं गरजेचेच होतं. मात्र, जे आपल्या सोबत युतीत निवडून आले ते बाळासाहेबांच्या विचाराचे खरे पाईक एकनाथ शिंदे आपल्यासोबत येत आपलं सरकार पुन्हा सत्तेत आणलं आहे.

Santosh Chaudhari : ‘बिग बॉस’फेम दादूसचा हळदीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार

यावेळी बोलताना त्यांनी कर्नाटक विजयावरही विरोधकांवर सडकून टीका केलीय. शिवसेना आणि राष्ट्रवादीची अवस्था ही बेगानी शादी मैं अब्दुल्ला दिवाना असल्याचं म्हणत टोलेबाजी लगावलीय. तर दुसऱ्याच्या घरात पोरगा झाला तरच हे नाचू शकतात, अशी यांची अवस्था असल्याच म्हणत येत्या काळात आपलंच सरकार येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये भगव्याच्या विचार पायदळी तुडवला जात होता.भगव्याचा विचार वाचवण्यासाठी मला घरी बसावं लागलं असत तरी चाललं असत. मला उपमुख्यमंत्री करुन पक्षाने सन्मानच केला असल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us