Download App

Pune: ज्येष्ठ लेखक राजन खान यांच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Pune News: जेष्ठ लेखक राजन खान यांच्या मुलाने आर्थिक कारणांतून पुण्याच्या मावळमध्ये गळफास घेऊन आत्महत्या धक्कादायक घटना समोर आली आहे. (Pune Police) ही घटना (सोमवारी) दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Pune Crime) डेबू राजन खान असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे, तो २८ वर्षांचा होता. डेबूने आत्महत्या करण्याच्या अगोदर एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती, त्या नोटमध्ये आई आणि मैत्रिणीचा उल्लेख त्याने केला आहे.

आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याचं प्राथमिक माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे. तसा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आढळला आहे. असं देखील तळेगाव पोलिसांनी (Talegaon Police) यावेळी सांगितले आहे. ज्येष्ठ लेखक राजन खान यांचा मुलगा डेबू खान याने सोमाटणे फाटा या ठिकाणी राहत्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Vivek Oberoi: प्रसिद्ध अभिनेता विवेक ऑबेरॉयला दीड कोटींचा गंडा, काय आहे नेमकं प्रकरण?

डेबू हा आयटी अभियंता असून तो सोमाटणे फाटा शिंदे वस्ती या ठिकाणी राहण्यास होता. आज सकाळपासून डेबू हा घराच्या बाहेर न आल्याने घरमालकिणीला संशय आला. फोन करून देखील तो बाहेर आला नसल्याची माहिती पुण्यात राहणाऱ्या भावाला देण्यात आली होती. भावाने लगेच सोमाटणे फाटा गाठून त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठवला. परंतु, खोलीतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने तळेगाव पोलिसांना याबाबत माहितीची देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा तोडला त्यावेळी डेबू हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

डेबूने आत्महत्या करण्याच्या अगोदर एक सुसाईट नोट देखील लिहिली आहे. त्यामध्ये त्याने मैत्रीण, आईचा उल्लेख केला आहे. तसेच त्याने काही आर्थिक देवाण- घेवाण केल्याचा उल्लेख देखील अनेकांकडे त्याचे पैसे अडकलेले होते. असं तळेगाव पोलिसांनी यावेळी सांगितल आहे. यामुळे त्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. डेबूचा मृतदेह तळेगाव येथील हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास तळेगाव पोलीस करत आहेत.

Tags

follow us