Vivek Oberoi: प्रसिद्ध अभिनेता विवेक ऑबेरॉयला दीड कोटींचा गंडा, काय आहे नेमकं प्रकरण?

Vivek Oberoi: प्रसिद्ध अभिनेता विवेक ऑबेरॉयला दीड कोटींचा गंडा, काय आहे नेमकं प्रकरण?

Vivek Oberoi: अभिनेता विवेक ओबेरॉयसह (Vivek Oberoi) आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपी या मनोरंजन (Entertainment) कंपनीच्या अंतर्गत आणखी तिघेजण ‘गुंसे’ नावाच्या सिनेमाची निर्मिती करणार होते. यासाठी 31 जानेवारी 2017 दिवशी त्यांच्यामध्ये करार करण्यात आला होता. त्याकरिता पूर्ण तयारी देखील करण्यात आली होती. सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Actor Nawazuddin Siddiqui) काम करणार होता. त्यासाठी मानधन म्हणून 51 लाख रुपये देण्यात आले होते.

तसेच सिनेमाचे शूटिंग लवकरच सुरू होणार होते. आणि एका एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीबरोबर भागीदारीसाठी बोलणी देखील करण्यात आली होती. ‘गुंसे’ सिनेमाचे नाव बदलण्यात आले होते. नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२२ या दरम्यान विवेक ओबेरॉय आणि त्याचे तीन भागीदार संजय शाह, नंदिता शाह आणि राधिका नंदा यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली होती. हा वाद कंपनीच्या पैशाचा वैयक्तिक वापर करण्यावरून सुरु झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)


यामध्ये विवेक ओबेरॉयच्या तिन्ही भागीदारांनी त्याला न कळवता सिनेमा शूट करण्यास सुरुवात केली होती. गुंसे सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या व्यक्तिरेखेचे नाव हड्डी होते. यामुळे हे नाव बदलून हड्डी नाव ठेवण्यात आल्याचे समोर आले. त्यासाठी आणखी एक नवीन कंपनी स्थापन करण्यात आली होती. आनंदिता एंटरटेनमेंट स्टुडिओ बॅनरखाली 7 सप्टेंबर दिवशी ‘हड्डी’ सिनेमा ओटीपीवर प्रदर्शित करण्यात आला.

Rockstar डीएसपीने दुबईतील ए.आर. रहमानच्या फिरदौस स्टुडिओला दिली खास भेट

विवेक ओबेरॉय यांनी 19 जुलै दिवशी कंपनी आनंदिता एंटरटेनमेंट एलएलपीचे भागीदार संजय शाह, नंदिता शाह आणि राधिका नंदा यांच्याविरोधामध्ये  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेचह सिनेमाच्या निर्मितीबद्दल आपली फसवणूक केल्याचे त्यांनी या तक्रारीमध्ये सांगितले आहे. या प्रकरणावरून एमआयडीसी पोलिसांनी ‘हड्डी’ सिनेमाचा कथित निर्माता संजय शाह याला अटक करण्यात आली होती.

या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिनेमा निर्माता संजय शहा याला पोलिसांनी कोर्टातून रिमांडवर घेऊन चौकशी सुरु करणार आहे. परिमंडळ १० चे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी या निर्मात्याच्या अटकेची माहिती यावेळी दिली आहे. तसेच या प्रकारणावर वांद्रे हॉलिडे कोर्टाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube