Pune Cyber News : यू ट्यूबला सबस्क्राइब आणि लाईक करण्यासाठी कमिशन देण्याचं अमिष दाखवून तरुणाला 50 लाखांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील धानोरीमध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरुन सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ahmednagar News : प्रशासनाची डोळेझाक, शहरात चांदणी चौकात डांबरचा डंपर पलटी
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनूसार, शुलभ नांगर अस या फसवणूक झालेल्या तरुणाचं नाव असून त्याला सायबर चोरट्यांनी मोबाईलवर संपर्क साधला. तेव्हा यू ट्यूबला सबस्क्राइब आणि लाइक करण्यासाठी आकर्षक कमिशन मिळेल, असे सांगितले. त्यानुसार आरोपींनी नांगर यांना सुरवातीला एक हजार ३५० रुपये कमिशनही दिले होते.
Letsupp Special : गडकरींचा हुकमी एक्का ठाकरेंच्या गळाला; भाजपचे दोन शहरातील टेन्शन वाढणार!
त्यानंतर शुलभला टेलिग्राम अॅपवरुन लिंक पाठवून कमिशनचे अमिष दाखवत विविध व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचा बहाणा केला. गुंतवणूकीपोटी त्यांनी एकूण 49 लाख 68 हजार रुपये दिले. मात्र, सायबर चोरट्यांनी त्याला या बदल्यात काहीच मोबदला दिला नाही.
अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. टेलिग्राम, व्हॉटसॲप आणि इ-मेलच्या माध्यमातून ‘टास्क जॉब’द्वारे पैशांचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याची अन्य एक घटना उघडकीस आली.
Jaybhim Panther: ‘जयभीम पँथर’ एक संघर्ष नवा मराठी सिनेमा लवकरच
याबाबत मुफ्फदल महम्मद (वय ४८, रा. एनआयबीएम, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान घडला.
Animal : टाइम्स स्क्वेअरवर झळकला अॅनिमल; टीझरने जगभरातील चाहते मंत्रमुग्ध
दरम्यान, पैशांचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना वाढत असून नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.