Download App

Pune : “तुमचं तिकीट फिक्स झालंय, पैसे पाठवा” पुण्यात इच्छुक उमेदवाराला कॉल

  • Written By: Last Updated:

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 27 फेब्रुवारीला ही मतदान होणार आहे. तर 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. कसबापेठ या मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड या मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत.

पोटनिवडणुकीमुळे प्रत्येक पक्षात इच्छुक आहेत. मात्र, त्यातही कसबा पोटनिवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप (BJP) कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच “तुमचं तिकीट फिक्स झालं आहे. ७६ हजार रुपये अकाउंटवर ट्रान्सफर करा. असा कॉल मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना आल्याने एकच खळबळ उडाली आहे.”

कॉल करणारी व्यक्ती टिळक यांना म्हणाली की, कसबा विधानसभा मतदारसंघासाठी तुमचं तिकीट फिक्स झालं आहे. ह्यासाठी तुम्ही ७६ हजार रुपये तातडीने ट्रान्सफर करा. त्यानंतर त्या नंबरची चौकशी केल्यावर हा फेक कॉल असल्याचे समोर आलं. त्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली असून संबधित व्यक्तीचा तपास सुरू असल्याचं या वेळी कुणाल टिळक सांगितले.

कसबा विधानसभा (Kasba Bypoll) पोटनिवडणुकीसाठी नक्की कोणाला संधी मिळणार ? याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण यामध्ये आता एक नवीन माहिती समोर येत आहे. राज्यातील भाजपकडून केंद्रीय निवड समितीला ५ नावांचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे अंतिम निर्णय केंद्रीय समितीकडून जाहीर केला जाईल. असं सांगण्यात येत आहे.

पाच नावे कोणाची ?

प्रदेश भाजपकडून पाठवण्यात आलेल्या पाच नावामध्ये भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या कुटुंबातील शैलेश टिळक (Shailesh Tilak) आणि कुणाल टिळक (Kunal Tilak) या दोन नावांचा समावेश आहे. याशिवाय पुण्यातील भाजपचे नगरसेवक हेमंत रासने, गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांचीही नावे निवड समितीला देण्यात आली आहेत. येत्या तीन दिवसात भाजपच्या केंद्रीय निवड समितीकडून निश्चित उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. असं सांगण्यात येत आहे.

Tags

follow us