वारजे पूलावर ‘घोडा’ काढणारा युवक ताब्यात, पोलिसांनी दिले बंदुकीचे डिटेल

Warje Bridge : पुण्यातील वारजे पूल ते नवले पूल दरम्यान एक युवक हातात फटाके वाजवण्याची बंदूक घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत होता.

Warje Bridge : वारजे पूलावर 'घोडा' काढणारा युवक ताब्यात, पोलिसांनी दिले बंदुकीचे डिटेल

Warje Bridge : वारजे पूलावर 'घोडा' काढणारा युवक ताब्यात, पोलिसांनी दिले बंदुकीचे डिटेल

Warje Bridge : पुण्यातील वारजे पूल (Warje Bridge) ते नवले पूल दरम्यान एक युवक हातात फटाके वाजवण्याची बंदूक घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत होता. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या हातात असलेली बंदूक खोटी असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम (Sambhaji Kadam) यांनी दिली आहे.

या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. अक्षय अंकुश गायकवाड (27) आणि सुनील चंद्रकांत शिंदेवर ( 28 )गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत ट्विट केले होते. या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुण्यातील वारजे पूल ते नवले पूल दरम्यान भरदिवसा बंदूक नाचवत दहशत पसरविण्याचा प्रकार झाला. ही घटना अतिशय गंभीर आहे. भाजपाप्रणीत महायुती सरकारच्या काळात गृहमंत्री कमकुवत असल्यामुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले. त्याची कटू फळे सर्वसामान्य जनतेला भोगावी लागत आहेत. महाविकास आघाडी अशा गुन्हेगारांचा बंदोबस्त करुन पुणे आणि राज्यभरात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहे.

PM Modi : पंतप्रधान मोदींनी सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी, पाहा फोटो

Exit mobile version