Download App

दुसऱ्या वनडेत पाकिस्तानचा धुव्वा; न्यूझीलंडने सामना अन् मालिकाही जिंकली..

आज हॅमिल्टन येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 84 धावांनी पराभव करत मालिका विजय साकारला.

PAK vs NZ : पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पाकिस्तानी टीम (PAK vs NZ) कमालाची अपयशी ठरली आहे. टी 20 मालिकेत 1-4 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर वनडे मालिकाही पाकिस्तानने गमावली आहे. आज हॅमिल्टन येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 84 धावांनी पराभव करत मालिका विजय साकारला.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 292 धावा केल्या होत्या. वेगवान सुरुवात केल्यानंतरही न्यूझीलंडचा डाव गडगडला. 132 धावा झालेल्या असतानाच पाच महत्वाचे फलंदाज बाद झाले होते. यामुळे संघ दडपणात आला होता. यानंतर मात्र मिशेलने न्यूझीलंडचा डाव सावरला. त्याने 99 धावांची खेळी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांना हैराण केले. त्याला नंतरच्या खेळाडूंनीही साथ दिली. मिशेलच्या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडला 292 धावा करता आल्या. मिशेलने सात षटकार आणि 7 चौकार खेचत संघाला सन्मानजनक स्थितीत आणले. सामना जिंकल्यानंतर मिशेलला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

न्यूझीलंडला धक्का! दुसऱ्या वनडेआधी नववा खेळाडूही आऊट; पाकिस्तानला विजयाची संधी

पाकिस्तानचे फलंदाज अपयशी

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी फलंदाजांवर दडपण जाणवत होते. अब्दुल शफीक आणि इमाम उल हक या दोघांनी सुरुवात केली. तिसऱ्याच ओव्हरमध्ये शफीक फक्त 1 रन करुन बाद झाला यानंतर बाबर आझम देखील अपयशी ठरला. बाबरलाही फक्त 1 रन करता आला. यानंतर जॅकब डफीने इमाम उल हकला बाद केले.

फक्त 9 धावांवर पाकिस्तानचे मुख्य तीन फलंदाज बाद झाले होते. यानंतर कर्णधार रिजवान आणि आगा सलमान या दोघांवर जबाबदारी होती. परंतु, बेन सियर्सने एकाच ओव्हरमध्ये दोघांनाही बाद केले. सियर्सने बाराव्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर आगा सलमान आणि चौथ्या चेंडूवर रिजवानला बाद केले. 65 धावा झालेल्या असताना सहावी विकेट पडली होती. नॅथन स्मिथने तैयब ताहीरला (13) बाद केले.

New Zealand VS Pakistan: पाक संघ पुन्हा तोंडावर आपटला ! टी-20 मालिका न्यूझीलंडने सहज जिंकली

यानंतर फहीम अशरफने 73 धावा करत पाकिस्तानचे आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. नसीम शाहने देखील चांगली खेळी केली. त्याने 44 चेंडूत 51 धावा केल्या. या दोघांच्या कामगिरीमुळे पाकिस्तानला 150 धावांचा टप्पा पार करता आला. परंतु, त्यांना विजय काही मिळवता आला नाही. या सामन्यात पराभवासह पाकिस्तानने मालिकाही गमावली आहे. आता तिसरा सामना जिंकला किंवा हरला तरी न्यूझीलंडला फरक पडणार नाही. याआधीच्या टी 20 मालिकेतही न्यूझीलंडनेच बाजी मारली होती.

follow us