Download App

पाकिस्तानला पुन्हा धक्का, पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा शानदार विजय

NZ Vs PAK : टी-20 मालिका गमावल्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला (NZ Vs PAK 2025) मोठा धक्का बसला आहे. नेपियरमध्ये

  • Written By: Last Updated:

NZ Vs PAK : टी-20 मालिका गमावल्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला (NZ Vs PAK 2025) मोठा धक्का बसला आहे. नेपियरमध्ये (Napier) खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने (NZ Vs PAK ODI) शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा 73 धावांनी पराभव केला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आता न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना 2 एप्रिल रोजी होणार आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 345 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र 44.1  षटकांत 271 धावा करून पाकिस्तानी संघ ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वधिक धावा केल्या. त्याने 83 चेंडूंचा सामना करत 78  धावा केल्या. तर सलमान आगानेही 58 झळकावले पाकिस्तानने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली होती मात्र न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब झाली . त्यांचे पहिले तीन विकेट्स फक्त 50 धावांत पडले होते मात्र त्यानंतर मार्क चॅपमन (Mark Chapman) आणि डॅरिल मिशेल (Daryl Mitchell) शानदार कामगिरी करत न्यूझीलंडला पुन्हा एकदा या सामन्यात आणले. दोघांमध्ये 199 धावांची भागिदारी झाली. या दरम्यान चॅपमनने त्याचे तिसरे एकदिवसीय शतकही पूर्ण केले. त्याने 11 चेंडूत 132 धावा केल्या.

सावधान, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

तर न्यूझीलंडकडून पाकिस्तानविरुद्ध पदार्पण करणाऱ्या मोहम्मद अब्बासने 26 चेंडूत 52 धावा केल्या. यावेळी त्याने एक नवीन विक्रम केला. एकदिवसीय पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम अब्बासच्या नावावर आहे. त्याने 24 चेंडूत अर्धशतक झळकावले. पाकिस्तानकडून इरफान खानने 3, अकिफ जावेद आणि हारिस रौफने 2-2  विकेट्स घेतल्या.

follow us