सावधान, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

IMD Alert : राज्यातील अनेक शहरात तापमान 40 अंशापेक्षा जास्त तापमान असल्याने नागरिकांना अनेक अडीअडचणीला तोंड द्यावे लागत आहे तर दुसरीकडे भारतीय हवामाव विभागाने पुढील दोन – तीन दिवस राज्यातील 4 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) देखील देण्यात आला आहे.
हवामान विभागाने सांगली (Sangli) , रत्नागिरी (Ratnagiri) , सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि कोल्हापूर (Kolhapur) या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विभागानुसार या चारही जिल्ह्यात 40 किमी ताशी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानात बदल पाहायला मिळत आहे त्यामुळे राज्यात दिवसा ऊन आणि संध्याकाळी थंड वारे वाहताना दिसत आहे. तर दुसरीकडे दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढल्याने तमिळनाडू, कर्नाटकमध्ये वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तण्यात येत आहे.
तर दुसरीकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने रत्नागिरीत शेकडो मच्छीमारी बोटी किनाऱ्याला आल्या आहेत.
छत्तीसगडमधील सुकमामध्ये 16 नक्षलवादी ठार; नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक
गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस
तर शुक्रवारी रात्री गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात दीड तास अवकाळी पाऊस झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील मिरचीचे पिकाला फटका बसला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात सध्या मिरचीची तोडणी झाली असून मिरची उन्हाळ्यात खुल्या मैदानामध्ये शेतकरी ठेवतात. परंतु त्या मिरचीला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.