PAK vs NZ : पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पाकिस्तानी टीम (PAK vs NZ) कमालाची अपयशी ठरली आहे. टी 20 मालिकेत 1-4 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर वनडेतही पाकिस्तान 1-0 अशा फरकाने पिछाडीवर पडला आहे. आता दुसरा एकदिवसीय सामना आज हॅमिल्टन येथे होणार आहे. परंतु, या सामन्याआधीच पाकिस्तानला धक्का देणारी बातमी आहे. पाकिस्तान संघावर आयसीसीने कारवाई केली आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात नेपीयर येथे पहिला एकदिवसीय सामना झाला. यात पाकिस्तानचा 73 धावांना पराभव झाला. मात्र या सामन्यात पाकिस्तानकडून एक चूक झाली. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाकिस्तान संघावर कारवाई केली आहे. पाकिस्तानी संघावर सामना शुल्काच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात पाकिस्तानला ओव्हर रेट कायम राखता आला नाही. आयसीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने दोन ओव्हर निर्धारीत वेळेपेक्षा उशिराने टाकल्या. यामुळे सामनाधिकारी जेफ क्रो यांनी ही शिक्षा सुनावली आहे.
न्यूझीलंडला धक्का! दुसऱ्या वनडेआधी नववा खेळाडूही आऊट; पाकिस्तानला विजयाची संधी
खेळाडू आणि सपोर्ट स्टाफासाठी आयसीसीच्या आचारसंहितेत काही नियम आहेत. यातील कलम 2.22 ओव्हर्सच्या गतीसंदर्भात आहे. यानुसार जर गोलंदाजाने निर्धारीत वेळेपेक्षा उशिराने गोलंदाजी केलीत तर अशा प्रत्येक ओव्हरसाठी खेळाडूंना सामना शुल्काच्या 5 टक्के दंड केला जातो. याच नियमानुसार पाकस्तानी खेळाडूंना 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. कारण पाकिस्तानने दोन ओव्हर उशिराने टाकल्या होत्या.
पाकिस्तानच्या कर्णधाराने शिक्षा मान्य केली आहे. त्यामुळे आता याबाबत कोणतीही सुनावणी होणार नाही. पाकिस्तान संघाने ओव्हर्सची गती कमी राखली असा आरोप मैदानातील पंच ख्रिस ब्राउन, पॉल रायफल, मायकल गॉफ आणी चौथे पंच वेन नाईट यांनी केला होता. यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने यातील सतत्या तपासून पाकिस्तान संघावर कारवाई केली.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिका होत आहे. या मालिकेत एकूण तीन सामने आहेत. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवत आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकून याही मालिकेत विजय मिळवण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न आहे. दुसरीकडे स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दुसरा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे हाच पर्याय पाकिस्तानसमोर आहे. दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी हॅमिल्टन येथे होणार आहे.
New Zealand VS Pakistan: पाक संघ पुन्हा तोंडावर आपटला ! टी-20 मालिका न्यूझीलंडने सहज जिंकली