Download App

177 धावांचा पाठलाग करताना भारताची पडझड

रांची : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात पहिला टी-20 सामना रांचीच्या (Ranchi) मैदानात सुरु आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला विजयासाठी 177 धावांचे लक्ष्य दिले आहे.

न्यूझीलंडने 20 ओव्हर्समध्ये 176/6 धावा केल्या. डॅरेल मिचेल 30 चेंडूत 59 धावांवर नाबाद राहिला. त्याचवेळी डेव्हन कॉनवेने 35 चेंडूत 52 धावांची खेळी केली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी कुलदीप आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. संघाने 15 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. शुभमन गिल (7), इशान किशन (4) आणि राहुल त्रिपाठी (0) वर बाद झाला. सूर्यकुमार यादव (47) धावांवर बाद झाला. हार्दिक पंड्याची (21) सुंदर (4) जोडी मैदानात आहे. 12 ओव्हर अखेरीस 84/4 अशी स्थिती आहे.

टीम इंडिया प्लेइंग-11
शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

Tags

follow us