Download App

MCA: अजिंक्य नाईक एमसीएचे अध्यक्ष, संजय नाईकांचा पराभव करत आशिष शेलारांना दिला धक्का

अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांनी संजय नाईक यांचा तब्बल 107 मतांनी पराभव केला. त्यांना आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा पाठिंबा होता.

  • Written By: Last Updated:

Ajinkya Naik is new Mumbai Cricket Association president: मुंबई क्रिकेट असोसिएशनला (Mumbai Cricket Association) नवे अध्यक्ष मिळाले आहेत. आज झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांनी संजय नाईक यांचा तब्बल 107 मतांनी पराभव केला. संजय नाईक यांना भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा पाठिंबा होता. एका अर्थाने हा आशिष शेलार यांना धक्का आहे.

एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे (Amol Kale) यांचे परदेशात निधन झाले.अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे झालेल्या टी 20 वर्ल्ड कपच्या दरम्यान काळे यांचे निधन झाले होते. त्यामुळे एमसीएचे अध्यक्ष पद रिक्त झाले होते. या पदासाठी अंजिक्य नाईक आणि संजय नाईक यांच्या लढत झाली. अजिंक्य नाईक यांना 221 मते मिळाली, तर संजय नाईक यांना 114 मते मिळाली आहे. अजिंक्य नाईक हे 38 वर्षांचे असून, ते एमसीएचे तरुण अध्यक्ष आहेत. ही दुखाची निवडणूक होती. माझा विजय हा अमोल काळे यांचा आहे. त्यांचा वारसा आणि त्यांचे काम पुढे नेण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो. शरद पवार यांच्यासह इतर पक्षातील नेत्यांना मला मदत केली. त्यांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया अजिंक्य नाईक यांची आहे.


‘वन्समोअर’ वादावर शिक्षणमंत्र्यांचं अजब स्पष्टीकरण, म्हणाले, मराठीत पर्यायी शब्द नाही


कुणाची कुणाला मदत?

या निवडणुकीत आशिष शेलार हे संजय नाईक यांच्या पाठीशी होते. ते त्यांच्यासाठी ताकद लावताना पाहिले. तर अजिंक्य नाईक यांना शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांनी मदत केल्याचे बोलले जात आहे.

आरक्षण बचाव यात्रेसाठी आंबेडकरांची जोरदार फिल्डिंग; पवारांसह सत्तेतल्या नेत्याला घातली गळ


अनेकांची मतदानाला दांडी

एमसीएच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. एमसीएला 375 प्रतिनिधी मतदार आहेत. त्यापैकी 335 प्रतिनिधींनी मतदान केले आहे.
शरद पवार, उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हेही प्रतिनिधी आहेत. परंतु या सर्वांना मतदानाकडे पाठ फिरवली.

follow us