Arjun Tendulkar Record: सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएलमध्ये पदार्पण केलेय. (Arjun Tendulkar Record) अर्जुन तेंडुलकर याने आतापर्यंत आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये संधी मिळताच मोठा इतिहास रचला आहे.
आयपीएलच्या (IPL) दुसऱ्या दिवशीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यात अर्जुनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याबरोबरच अर्जुनने एका गोष्टीमध्ये त्याचे वडील सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. वेगवान गोलंदाज ओळख असणारा अर्जुन तेंडुलकरने हैदराबादविरुद्ध शेवटच्या षटकात खूपच चांगली गोलंदाजी केली आहे. हैदराबादला शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती, पण अर्जुनने शानदार आणि वेगवान गोलंदाजी करत केवळ ५ धावा दिल्या आणि त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली आहे. यावर वडील सचिनने एक हृदयस्पर्शी ट्विट केले आहे.
अर्जुन तेंडुलकरने आयपीएल पदार्पणाच्या सामन्यामध्ये कोलकाताविरुद्ध दोन षटकात १७ धावा दिले होते. यावेळी हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने २.५ षटके टाकत असताना १८ धावांत एक विकेट घेतली आहे. मात्र, या दोन्ही सामन्यात अर्जुनला आतापर्यंत फलंदाजीची संधी मिळाली नाही. आयपीएलमध्ये विकेट घेण्याबद्दल अर्जुनने वडील सचिन तेंडुलकर यांना मागे टाकले आहे. आयपीएलचे ६ सीझन खेळून देखील सचिन एकही विकेट घेऊ शकला नव्हता.
क्रिकेट विश्वात खळबळ; फिक्सिंगसाठी भारताच्या ‘स्टार’ खेळाडूला मोठी ऑफर
सचिन तेंडुलकरची आयपीएल कारकीर्द
भारताचा महान माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने आयपीएलमध्ये ७८ सामन्यामध्ये ३३.८३ च्या सरासरीने २३३४ धावा केले आहेत. यात एक शतक आणि १३ अर्धशतकांचा समावेश करण्यात आला आहे. सचिनने फक्त आयपीएलमध्ये २००९ मध्ये गोलंदाजी केली होती. त्यावेळेस त्याने ६ षटके टाकून ५८ धावा काढल्या होत्या, मात्र त्याला एकही विकेट घेता आलेली नव्हती.
वडिलांनी केले अभिनंदन
हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुन तेंडुलकरविषयी एक खास पोस्ट ट्विटवर केली आहे. मुंबई इंडियन्सने परत एकदा शानदार कामगिरी केल्याचे सचिनने लिहिले आहे.