Video : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा; के. एल. राहुल-अय्यरचे पुनरागमन

Asia Cup 2023 Team India Squad Announced : आगामी आशिया चषकासाठी (Asia Cup 2023) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, BCCI कडून 17 सदस्यीय संघ निवडण्यात आला आहे. येत्या 30 ऑगस्टपासून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली आहे. Rohit Sharma (Captain), Shubman Gill, […]

Letsupp Image   2023 08 21T135020.277

Letsupp Image 2023 08 21T135020.277

Asia Cup 2023 Team India Squad Announced : आगामी आशिया चषकासाठी (Asia Cup 2023) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, BCCI कडून 17 सदस्यीय संघ निवडण्यात आला आहे. येत्या 30 ऑगस्टपासून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली आहे.

असा आहे अशिया चषकासाठीचा भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, रविंद्र जडेजा, हार्दिक पंडय्या, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संघात स्थान देण्यात आले आहे तर, संजू सैमसनला राखीव यष्टिरक्षक म्हणून ठेवण्यात आले आहे.

वर्ल्डकपचं वेळापत्रक पुन्हा बदलणार? पाकिस्तानचाच सामना ठरतोय कारण

पाकिस्तानविरूद्ध  2 सप्टेंबरला महामुकाबला 

या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार असू, टीम इंडिया 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्याचबरोबर आशिया चषकाचा अंतिम सामना १७ सप्टेंबरला होणार आहे. यावेळी ही स्पर्धा ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये होणार आहे. आशिया चषकाचे सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार असून, भारतीय संघाने पाकिस्तान दौऱ्याला नकार दिल्यानंतर ICC आणि PCB ने ‘हायब्रिड मॉडेल’ स्वीकारले. टीम इंडियाचे सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहे.

World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाचा ‘शुभंकर’ लॉन्च

मिडल ऑर्डर मजबूत 

विकेटकीपर आणि फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे  केएल राहुल आणि श्रेयस अय्यर संघातून बाहेर होते. मात्र, आता हे दोन्ही खेळाडू पूर्णपणे तंदुरूस्त झाले आहेत. आयपीएल 2023 च्या हंगामात केएल राहुल शेवटचा मैदानावर दिसला होता. केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाची मिडल ऑर्डर मजबूत झाली आहे.

आशिया कपमध्ये टीम इंडियाचा दबदबा

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात आशिया चषकाचे 15 हंगाम खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाने सर्वाधिक 7 वेळा (1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018) विजेतेपद पटकावले आहे. तर श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर असून, श्रीलंका संघ 1986, 1997, 2004, 2008, 2014, 2022 असे 6 वेळा चॅम्पियन ठरला आहे. पाकिस्तानला केवळ दोनदा (2000, 2012) विजेतेपद मिळवता आले आहे.

Exit mobile version