Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेतील (Asia Cup 2023) सुपर 4 फेरीतील सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव करत फायनलचं तिकीट पक्कं केलं. या सामन्यात भारतीय संघाची (Team India) फलंदाजी ढेपाळली तरी फिल्डिंग आणि गोलंदाजी जबरदस्तच होती. या कामगिरीच्या जोरावर भारताने कमी धावांच्या आव्हानावरही कडवी झुंज देत श्रीलंकेला (IND vs SL) नमवले. हा चमत्कार झाला तरी कसा याचं उत्तर आता मिळालं आहे.
या स्पर्धेत (Asia Cup 2023) टीम इंडियाची सुरुवात चांगली राहिली नाही. पहिल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पावसाने खेळ केल्याने सामना रद्द झाला. परंतु, पावसाआधी जो काही सामना झाला होता त्यात संघाची कामगिरी निराशाजनकच होती. यानंतर नेपाळशी (Nepal) गाठ पडली. तसा हा संघ नवखाच. त्यामुळे टीम इंडियाने सहज विजय मिळवला तरी या सामन्यात फिल्डिंग सुमार राहिली. त्यामुळे रोहित शर्माने (Rohit Sharma) चिंता व्यक्त केली होती. या सामन्यानंतर रोहित जे काही बोलला त्याचा परिणाम संघातील खेळाडूंवर झाल्याचे दिसून आले. यानंतर टीम इंडियाचा लूक बदलला आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात संघाच्या शिलेदारांनी फिल्डिंग आणि गोलंदाजीत कमाल केली.
हॉकीमध्ये पाकिस्तानला धक्का, ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेचे यजमानपद गमावले
या सामन्यात (Asia Cup 2023) भारताने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. या विजयानंतर संघाची फायनलसाठी जागा पक्की झाली. भारतीय संघाला या सामन्यात जास्त धावा करता आल्या नाहीत. 49.1 ओव्हर्समध्ये फक्त 213 धावा करता आल्या. त्यामुळे भारत हा सामना जिंकणार का याची धाकधूक चाहत्यांना होती. प्रत्यक्षात मात्र गोलंदाजी आणि फिल्डिंगच्या जोरावर हा सामना टीम इंडियाने खिशात टाकला. श्रीलंकेचा संघ 41.3 ओव्हर्समध्ये फक्त 172 धावांवरच गारद झाला.
याआधी नेपाळविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंनी तीन कॅच सोडले होते. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि इशान किशन कॅच घेऊ शकले नाहीत. फिल्डिंगही सुमारच होती. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात संघाचा अवतार काही वेगळाच होता. शानदार फिल्डिंग आणि तितकेच शानदार कॅच घेताना दिसले. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (KL Rahul) यांनी शानदार कॅच घेतले.
WHAT A CATCH BY KL RAHUL 🔥
– Bumrah with a beauty…!!!!pic.twitter.com/Q4KPwfi3tt
— Johns. (@CricCrazyJohns) September 12, 2023
सुपर-4 च्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघ 2023 च्या आशिया कपच्या (Asia Cup 2023) अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाने प्रथम खेळून 213 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ 172 धावांत गडगडला. श्रीलंकेकडून गोलंदाजीत 5 बळी घेणारा ड्युनिथ वेलालगे 42 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून कुलदीप यादवने अप्रतिम गोलंदाजी केली. कुलदीपने चार विकेट घेतल्या. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहनेही 2-2 बळी घेतले. या सामन्यातील पराभवाबरोबरच श्रीलंकेचा एकदिवसीय क्रिकेटमधील सलग 13 सामने जिंकण्याची मालिकाही खंडित झाली.