Download App

Asia Cup 2023 : भारताचा UAE वर शानदार विजय, कर्णधार यश धुलने नाबाद शतक

  • Written By: Last Updated:

ACC Men’s Emerging Teams Asia Cup 2023 च्या तिसऱ्या सामन्यात India A ने UAE A चा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय कर्णधार यश धुलने चमकदार कामगिरी केली. त्याने नाबाद शतक झळकावले. प्रथम फलंदाजी करताना UAE A संघाने 50 षटकात 176 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारताने 26.3 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून निकिन जोसने नाबाद 41 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. (Asia Cup 2023: India’s stunning win over UAE, skipper Yash Dhul’s unbeaten century)

UAE ने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 26.3 षटकात 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून साई सुदर्शन आणि अभिषेक शर्मा सलामीला आले. मात्र या दोन्ही फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. सुदर्शनने 8 चेंडूत 8 धावा केल्या आणि तो बाद झाला. अभिषेक 19 धावा करून बाद झाला.

यशने कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने 84 चेंडूंचा सामना करत नाबाद 108 धावा केल्या. यशच्या खेळीत 20 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याचवेळी निकिनने 53 चेंडूत नाबाद 41 धावा केल्या. त्याने 5 चौकार मारले. अशा प्रकारे टीम इंडियाने दणदणीत विजय नोंदवला.

यशस्वीसमोर वेस्टइंडिज ‘अयशस्वी’, दुसऱ्याच दिवशी टीम इंडियाची सामन्यावर पकड मजबूत

UAE संघ 50 षटकात 9 गडी गमावून 175 धावाच करू शकला, सलामीवीर आर्यांश शर्माने 42 चेंडूत 38 धावा केल्या. आर्यनशने 7 चौकार मारले. कर्णधार वाल्थापा चिदंबरमने 107 चेंडूत 46 धावा केल्या. त्यांना एकही चौकार लगावता आला नाही. मोहम्मद फराजुद्दीनने 88 चेंडूत 35 धावा केल्या. याशिवाय कोणताही खेळाडू जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही.

भारताकडून हर्षित राणाने 4 बळी घेतले. त्याने 9 षटकात 41 धावा दिल्या. नितीश रेड्डीने 5 षटकात 32 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. मानव सुथारने 10 षटकात 28 धावा देत 2 बळी घेतले. आकाश सिंगने 4.3 षटकात 10 धावा देत एक विकेट घेतली.

 

Tags

follow us