Download App

Asia Cup 2023 : किंग कोहलीने ठोकले 47 वे शतक, सचिनचा विक्रम मोडला

IND vs PAK: आशिया चषक 2023 च्या सुपर 4 सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात कारकिर्दीतील 47 वे शतक झळकावले आहे. हे त्याचे पाकिस्तानविरुद्धचे वनडेतील तिसरे शतक ठरले. या शतकासह किंग कोहलीने एकदिवसीय फॉर्मेटमध्ये आपल्या 13,000 धावा पूर्ण केल्या. चिन तेंडुलकरचा विक्रम मोडत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान 13,000 धावा करणारा फलंदाज बनला आहे.

विराट कोहलीने सचिनचा विक्रम मोडला
विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात 84 चेंडूत शतक पूर्ण केले आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 13000 धावा करणारा फलंदाज बनला. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, मात्र आता कोहलीने त्याच्याही पुढे गेला आहे. सचिनने 321 डावात तेरा हजार एकदिवसीय धावा केल्या होत्या तर कोहलीने 267 व्या डावात हा पराक्रम केला होता.

IND vs PAK : पाकिस्तानसमोर धावांचा डोंगर; विराटने इतिहास रचला, राहुलचे दणक्यात पुनरागमन

सर्वात जलद 13,000 धावा करणारे फलंदाज
विराट कोहली- 267 डाव
सचिन तेंडुलकर- 321 डाव
रिकी पाँटिंग- 341 डाव

सर्वात वेगवान 77 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 77 शतके झळकावण्यात यश मिळवले आणि सचिन तेंडुलकरला मागे सोडले. सचिनने 594 डावात 77 शतके पूर्ण केली होती तर कोहलीने 561 डावात हा पराक्रम केला होता. तर कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 47 शतके करणारा फलंदाज बनला आणि येथे सचिनचा विक्रमही मोडला. सचिनने आपल्या 435 व्या डावात 47 वे एकदिवसीय शतक पूर्ण केले होते तर कोहलीने 267 व्या डावात हा पराक्रम केला होता.

Tags

follow us