Download App

Asia Cup 2023 : कन्फर्म! भारत-पाकिस्तान ‘या’ दिवशी पुन्हा भिडणार

Asia Cup 2023 : नेपाळचा 10 गडी राखून पराभव करत भारताने आशिया चषकाच्या (Asia Cup 2023) सुपर-4 फेरीत प्रवेश केला आहे. या विजयानंतर भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात पुन्हा सामना होणार असल्याचेही निश्चित झालं आहे. कारण, नेपाळचा (Nepal) पराभव करत भारत सुपर फोरमध्य दाखल झाला आहे. या गटात पाकिस्तान अव्वल क्रमांकावर आहे. आशिया चषकाच्या नियोजनानुसार लीग पातळीवरील पहिल्या दोन संघात सुपर फोरमध्ये पुन्हा सामना होतो. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा भिडणार आहेत. हा सामना येत्या 10 सप्टेंबर रोजी श्रीलंकेत होणार आहे.

Asia Cup 2023 : भारताचा नेपाळवर शानदार विजय, पुन्हा भारत-पाक महामुकाबला

काल झालेल्या सामन्यात (Asia Cup 2023) नेपाळ संघाने प्रथम खेळून 230 धावा केल्या होत्या, परंतु भारतीय डावात पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर सामना सुमारे दोन तास थांबवण्यात आला. यानंतर डकवर्थ लुईस नियम लागू करण्यात आला आणि भारताला 23 षटकात 145 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाने (Team India) 21व्या षटकात लक्ष्याचा पाठलाग केला. भारताकडून रोहित शर्माने (Rohit Sharma) 74 आणि शुभमन गिलने 67 धावा केल्या. दोघेही सामने जिंकून परतले. अशा प्रकारे भारताने नेपाळचा 10 विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारतीय संघ 2023 आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत पोहोचला आहे.

या सामन्याआधी (Asia Cup 2023) पाकिस्तानने तीन गुणांसह सुपर फोरमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ग्रुप ए मध्य गुणतालिकेत 4.76 इतक्या नेट रनरेटसह पाकिस्तान पहिल्या नंबरवर आहे. कालच्या सामन्यात विजय मिळवून भारतानेही तीन गुणांसह सुपर फोरमध्ये एन्ट्री घेतली आहे. येत्या 10 सप्टेंबर रोजी दोन्ही संघात पुन्हा सामना होईल. त्यानंतर सुपर फोरमधील निकाल या दोन्ही संघांच्या बाजूने लागले तर आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यातही भारत आणि पाकिस्तान भिडताना दिसू शकतात.

बांगलादेशचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, सुपर-4 च्या आशा जिवंत

अफगाणिस्तान संघाला शेवटची संधी

आशिया कप स्पर्धेतील (Asia Cup 2023) चौथ्या सामन्यात बांगलादेशने अफगाणिस्तानचा (BAN vs AFG) 89 धावांनी पराभव केला. कराचीतील नॅशनल स्टेडियमवर रविवारी झालेल्या या विजयासह ‘ब’ गटातील बांगलादेशचे खाते उघडले. आता त्याचे दोन सामन्यांत दोन गुण झाले असून सुपर-4 मध्ये जाण्याच्या त्याच्या आशा जिवंत आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तानला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आता सुपर-4 गाठण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल.

Tags

follow us