Asia Cup 2023: आशिया कप 2023 चा (Asia Cup 2023) पहिला सामना बुधवारी पाकिस्तान आणि नेपाळ (Nepal VS Pakistan) यांच्यात होणार आहे. पाकिस्तानने अलीकडेच एकदिवसीय मालिकेत अफगाणिस्तानचा 3-0 असा पराभव केला आहे. पाकिस्तानचा संघ खूप मजबूत आहे. नेपाळला पाकिस्तानचे कडवे आव्हान असणार आहे. नेपाळने गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सामना वाचवण्यासाठी ते मेहनत घेताना दिसतील. या सामन्यासाठी पाकिस्तान आणि नेपाळचे संघ प्लेइंग इलेव्हन संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
पाकिस्तान संघ फखर जमान आणि इमाम-उल-हक यांना सलामीची संधी देऊ शकतो. मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि इफ्तिखार अहमद यांच्यानाही संधी जाऊ शकते. इमामने गेल्या अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. फखरही चांगला अनुभवी खेळाडू आहे. त्याने पाकिस्तानसाठी अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह हे संघाचे दोन उत्कृष्ट गोलंदाज आहेत. प्लेइंग इलेव्हनमधील या दोघांचे स्थान जवळपास निश्चित आहे.
Nagarjuna Birthday: ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर फिदा झाला होता नागार्जुन!
एप्रिल-मे मध्ये झालेल्या ACC पुरुष प्रीमियर कप 2023 मध्ये नेपाळने चमकदार कामगिरी केली. संघाने अंतिम फेरीत यूएईचा 7 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत नेपाळकडून कुशल मल्लाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 4 डावात 238 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार रोहित पौडेलने 5 सामन्यात 187 धावा केल्या. नेपाळ कुशलला आशिया चषकाच्या पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देऊ शकतो. त्याचबरोबर आसिफ शेख आणि भीम शर्की यांनाही संघात स्थान मिळू शकते. करण केसी आणि ललित राजबंशी यांनाही स्थान मिळू शकते.
Jawanच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघताय? मग किंग खानच्या ‘या’ सरप्राईजने व्हाल खूश!
संभाव्य 11 खेळाडू –
पाकिस्तान : फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, आगा सलमान, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.
नेपाळ : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), भीम शार्की, रोहित पौडेल (कर्णधार), कुशल मल्ला, आरिफ शेख, संदीप लामिछाने, सोमपाल कामी, करण केसी, ललित राजबंशी, गुलसन झा.