Jawanच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघताय? मग किंग खानच्या ‘या’ सरप्राईजने व्हाल खूश!

Jawanच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघताय? मग किंग खानच्या ‘या’ सरप्राईजने व्हाल खूश!

Jawan Trailer Release Announcement: किंग खानचा (King Khan) ‘जवान’ (Jawan Trailer) सिनेमा प्रदर्शित होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. परंतु अद्याप सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला नाही. (Shah Rukh Khan) अशावेळी चाहते ‘जवान’च्या ट्रेलरची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. आता या सगळ्यात चाहत्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. ‘जवान’चा ट्रेलर प्रदर्शित होण्याअगोदर किंग खानने चाहत्यांना मोठं सरप्राईज दिले आहे.

किंग खानच्या बहुप्रतिक्षित ‘जवान’ या सिनेमाच्या ट्रेलरची प्रदर्शित तारीख जाहीर करण्यात आली आहे. या महिन्यातमध्ये सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘जवान’चा ट्रेलर ३१ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा खुलासा स्वतः खुद्द किंग खानने केला आहे. किंग खानने बुर्ज खलिफाचा फोटो शेअर करत सांगितले आहे की, ‘जवानचा आनंद मी तुमच्याबरोबर साजरा करणार नाही, असं होऊच कसं शकतं…येतोय मी, ३१ ऑगस्टला रात्री ९ वाजता बुर्ज खलिफावर.. जवानचा आनंद साजरा करूया. आणि या जगात प्रेम सगळ्यात सुंदर आणि महत्त्वाची गोष्ट आहे. प्रेमाचा रंग लाल आहे. तर, या दिवशी सगळ्यांनी लाल कपडे घातले तर… काय म्हणता? तयार राहा…’

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)


तसेच किंग खानने ‘जवान’ सिनेमातील नव्या गाण्याच्या प्रदर्शितची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे. ‘जिंदा बंदा’ आणि ‘चलेया’ या गाण्यांनंतर सिनेमाचे तिसरे गाणे ‘नॉट रमैया वस्तावैय्या’ आज (२९ ऑगस्ट) प्रदर्शित करण्यात येणार आहे. हे गाणे डान्स फ्लोअरला नक्कीच आग लावणार हे नक्की आहे. दुसरीकडे सिनेमा निर्मात्यांनी परदेशात ‘जवान’चे आगाऊ बुकिंग सुरू केले आहे. अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया आणि जर्मनीसारख्या अनेक देशांत या सिनेमाची तिकिटे रोजच मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. अमेरिकेत ४५० ठिकाणी आगाऊ बुकिंग करून सुमारे २ कोटींची कमाई अगोदरच झाल्याचे बघायला मिळत आहे.

Shreyas Talpade : श्रावणी सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला आलं श्रेयसचं ‘ओम नमः शिवाय’ गाणं

‘जवान’ चे दिग्दर्शन अॅटलीने केले आहे, तर गौरी खान आणि गौरव वर्मा यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ दिवशी जगभरातील सिनेमागृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमात किंग खानसोबत नयनतारा मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. तर, दीपिका पदुकोण कॅमिओ करत असताना दिसणार आहे. तसेच विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा आणि प्रियामणी हे स्टार्सही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube