Asia Cup : पुढील महिन्यापासून सुरु होणाऱ्या आशिया कप 2025 पूर्वी भारतासाठी एक वाईट बातमीसमोर येत आहे. या बातमीनुसार, भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी तो या स्पर्धेतून माघार घेणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्सनुसार करण्यात येते आहे. मात्र याबाबत बीसीसीआयकडून (BCCI) कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर दुसरीकडे 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 (Asia Cup 2025) ची सुरुवात होणार आहे. भारत या स्पर्धेत 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे.
बुमराह आशिया कपमध्ये खेळणार नाही?
आशिया कप 2025 चा अंतिम सामना 29 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जर जसप्रीत बुमराह आशिया कपमध्ये खेळला तर तो वेस्ट इंडिडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. जर बुमराह आशिया कपमध्ये खेळला तर त्याला एक महिन्याचा ब्रेक दिला जाऊ शकतो आणि त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटीमध्ये खेळताना दिसू शकतो. तसेच जानेवारी महिन्यात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत बुमराह टी-20 क्रिकेट खेळताना दिसू शकतो अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.
अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी
तर दुसरीकडे इंग्लंडविरुद्ध सुरु असणाऱ्या अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफीच्या तीन सामन्यात बुमराहने शानदार गोलंदाजी केली आहे. या तीन सामन्यांमध्ये त्याने 26 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या आहेत. पाच सामन्यांच्या या मालिकेत तो तीन सामने खेळणार असल्याची माहिती मालिकेच्या सुरुवातीलाच बीसीसीआयकडून देण्यात आली होती.
दंगल आणि आतंक करणाऱ्यांचा रंग हिरवा, मंत्री नितेश राणेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य