दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेते पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय हे दोन्ही खेळाडू उपांत्यपूर्व फेरीतील सामने गमावल्यानंतर आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधून बाहेर पडले आहेत. आठव्या मानांकित सामन्यात सिंधूने एका गेमची आघाडी घेतली होती पण कोरियाच्या एनसी यंगकडून 21-18, 5-21, 9-21 असा पराभव पत्करावा लागला आहे.
Defamation Case : राहुल गांधींना दिलासा मिळणार? याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी
सिंधूने पहिल्या गेममध्ये चांगली कामगिरी केली होती पण पुढच्या दोन गेममध्ये ती पुढे जाऊ शकली नाही. तर प्रणॉयला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या कांता त्सुनेयामाकडून पराभव पत्करावा लागला. प्रणॉय या सामन्यात 11-21, 9-13 असा पिछाडीवर होता, जेव्हा त्याने दुखापतीमुळे सामना मध्यभागी सोडला होता.
कर्नाटक निवडणुकीत आरोप- प्रत्यारोपांची राळ; मोदी म्हणाले, काँग्रेसकडून मला 91 वेळा शिवीगाळ
याआधी, क्वालिफायरच्या सामन्यात रोहन कपूर आणि एन सिक्की रेड्डी यांना मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या डेजान आणि ग्लोरिया इमॅन्युएल विजा यांच्याकडून 18-21, 21-19, 15-21 असा पराभव पत्करावा लागला. हा सामना एक तास पाच मिनिटे चालला.