Download App

Asian Games 2023 : बीडच्या अविनाश साबळेची ‘सुवर्ण’कामगिरी, 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये मारली बाजी

  • Written By: Last Updated:

Asian Games 2023 : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई स्पर्धांमध्ये (Asian Games) महाराष्ट्रातील बीडच्या सुपुत्राने सुवर्ण कामगिरी केली आहे. अविनाश साबळेने आशियाई स्पर्धेत इतिहास रचला आहे. त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेस (Steeplechase) प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. अविनाश साबळेच्या (Avinash Sable) या यशाने भारताला आणखी एक सुवर्णपदक जिंकण्यात यश आले आहे. या कामगिरीसाठी अविनाशचे खूप कौतुक केले जात असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे. अविनाश साबळे याने आज चीनमध्ये महाराष्ट्राचे नाव गाजवले, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अविनाशने 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. तसेच, अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. त्याने 8:19:53 मिनिटे पूर्ण केले. या स्पर्धेतील भारताचे हे 12वे सुवर्णपदक आहे.

रत्नागिरीला पावसाने झोडपलं! पुढील दोन दिवसही सुट्टी नाही; हवामान विभागाने सांगितलं 

अविनाश गेल्या महिन्यात बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 7 व्या स्थानावर होता. त्यामुळे खुद्द अविनाश साबळेसुद्धा त्याच्या कामगिरीवर खूश नव्हता. मात्र, आता त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत नव्या उमेदीने सहभाग घेतला आणि आज सुवर्णपदक पटकावले.

दरम्यान, सातव्या दिवसाअखेर भारताच्या पदकांची संख्या 38 वर पोहोचली आहे. गुणतालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे. यजमान चीन या यादीत अव्वल आहे. तर दुसऱ्या स्थानावर जपान तर तिसऱ्या स्थानावर रिपल्बिक ऑफ कोरिया आहे.

कोण आहे अविनाश साबळे?
काही वर्षापूर्वीपर्यंत लांब पल्ल्याच्चया धावपटूंच्या नावावार भारताचा कोटा रिक्त होता. पण, बीडमधील मांडवा गावात 13 सप्टेंबर 1994 रोजी जन्मलेल्या अविनाशे ती जागा भरून काढली. अविनाशने पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याचे आई-वडील वीटभट्टीवर काम करायचे आणि त्यातही त्यांना तो मदत करत असे. घरापासून शाळा ६ किलोमीटर दूर असल्यानं त्यांना पायीच शाळेत जावं लागे. अशावेळी तो शाळेत जाताना धावण्याचा सराव करायचा.

त्याच्या याच धावण्याच्या सवयीमुळं तो 2005 मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. मात्र, त्याने खेळात करिअर करायचा कधी विचार केला नव्हता, मात्र, आज त्याने इतिहास रचला.

तजिंदरपाल सिंहचीही सुवर्ण कामगिरी

भारताच्या तजिंदरपाल सिंह तूरनेही आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या शॉटपुटमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याने जबरदस्त पहिल्या थ्रोने सुरुवात केली. त्याची फेक सुमारे 20 मीटरपर्यंत पोहोचली. पण तो नो थ्रो मानला गेला. त्यानंतर त्याने सहाव्या प्रयत्नात 20.36 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले.

 

Tags

follow us