Download App

स्क्वॉशनंतर हॉकीमध्येही पाकिस्तानला धूळ चारली, भारतीय टीमचे शानदार प्रदर्शन

Asian Games 2023: चीनमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रिडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारतीय हॉकी संघाने पाकिस्तान (India vs Pakistan hockey) विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताने हा सामना 10-2 अशा फरकाने जिंकला आहे. यामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे कठीण झाले आहे. या सामन्यात भारतीय हॉकी संघाने पूर्वार्धापासून आपली पकड मजबूत करत 2-0 अशी बरोबरी साधली. यानंतर दुसऱ्या हाफच्या शेवटी स्कोअर लाइन 4-0 अशी झाली.

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने भारतासाठी सर्वाधिक 4 गोल केले. वरुणलाही 2 गोल करण्यात यश आले. याशिवाय समशेर, मनदीप, ललित आणि सुमित यांनी प्रत्येकी एक गोल केला.

World Cup 2023: भारत-इंग्लंड सामन्यात ‘पावसा’चा सराव, खेळाडू पव्हेलियनमध्येच

पहिल्या दोन हाफमध्ये भारताची 4-0 आघाडी
हॉकीच्या या महत्त्वाच्या लढतीत भारतीय संघाने पहिला गोल पहिल्या हाफच्या 8व्या मिनिटाला केला. यानंतर दुसरा गोलही 11व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकमध्ये झाला. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवरून अप्रतिम गोल केला. दुसरा हाफ संपण्यापूर्वी सुमित, ललित आणि गुरजंत यांनी उत्कृष्ट समन्वय दाखवत चौथा गोल केला. उत्तरार्ध संपल्यानंतर या सामन्यात भारत 4-0 ने आघाडीवर होता.

Yaariyan 2 च्या निमित्ताने मीझान जाफरीने शेअर केला भावंडांसोबतचा बॉंड

तिसऱ्या हाफमध्ये पाकिस्तानचे 2 गोल
या सामन्याच्या तिसऱ्या हाफला सुरुवात झाल्याने भारताने आपली लय कायम ठेवली आणि पेनल्टी स्ट्रोकद्वारे पाचवा गोल केला. यानंतर पाकिस्तानने पेनल्टी स्ट्रोकमध्ये 1 गोल केला, तथापि, भारताने आणखी 2 गोल केले आणि स्कोअर लाइन 7-1 ने नेली. तिसरा हाफ संपण्यापूर्वी पाकिस्तानने आणखी एक गोल केला आणि स्कोअर लाइन 7-2 अशी वाढवली.

शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताचे 3 गोल
भारताने सामन्याच्या शेवटच्या क्वार्टरमध्ये आपला वेग कायम ठेवत आणखी 3 गोल केले आणि 10-2 अशा फरकाने सामना संपवला. या सामन्यात पाकिस्तानी संघाकडून अनेक चुकाही पाहायला मिळाल्या. आता भारताला अ गटातील शेवटचा सामना बांगलादेश संघाविरुद्ध खेळायचा आहे.

Tags

follow us