Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) पहिल्यांदाच भाग घेणाऱ्या भारताने चांगली सुरुवात केली आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यात भारतीय खेळाडूंनी रौप्यपदकांची कमाई केली. त्यानंतर आता हॉकीसंघाने (Indian Hockey Team) अभिमानास्पद विजय मिळवून दिला आहे. हॉकी संघाने धडाकेबाज करत उझबेकिस्तान (Uzbekistan) विरुद्धच्या सामन्यात दणादण गोल करत विजय खेचून आणला. य विजयानंतर स्पर्धेतील भारताच्या पदकांची संख्या 5 झाली आहे. मात्र भारताला अजूनही सुवर्णपदक मिळालेले नाही. भारत विरुद्ध उझबेकिस्तान सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने उझबेकिस्तानचा 16-0 अशा फरकाने दणदणीत पराभव केला. भारताकडून ललित उपाध्यायने सर्वाधिक गोल केले. तर वरुण कुमार आणि मनदीप सिंह या दोघांनी प्रत्येकी तीन गोल केले. आता पुढील सामन्यात टीम इंडिया सिंगापूरशी भिडणार आहे.
Asian Games 2023 : भारताने खाते उघडले; नेमबाजी आणि रोईंग प्रकारात रौप्यपदकांवर कोरलं नाव
या सामन्यात सुरुवातीपासूनच भारतीय संघाचे नियंत्रण होते. सामना सुरू झाल्यानंतर सातव्या मिनिटाला ललित उपाध्यायने पहिला गोल केला. त्यानंतर आणखी एक गोल झाला. अशा प्रकारे सुरुवातीलाच टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने दमदार खेळ करत प्रतिस्पर्धी उझबेकिस्तानवर दडपण कायम ठेवले. या टप्प्यात सुरुवातीलाच अभिषेकने गोल केला. त्यामुळे भारतीय संघाची 3-0 अशी आघाडी झाली. पुढील मिनिटाला मनदीप सिंह याने उत्कृष्ट गोलपोस्टमध्ये पाठवून आणखी एक आघाडी मिळवून दिली.
यानंतर सामन्याच्या 24 व्या मिनिटाला ललित कुमार उपाध्यायने आणखी एक गोल केला. पुढील काही मिनिटात बॅक टू बॅक दोन गोल केले. त्यामुळे 7-0 अशी विजयी आघाडी भारताला मिळाली होती. या काळात उझबेकिस्तानच्या संघाला एकही गोल करता आला नाही. यानंतर दुसऱ्या हाफमध्येही खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत 16-0 अशी आघाडी मिळवू दिली. उझबेकिस्तानच्या संघाने गोल करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळाले नाही. या विजयानंतर आता येत्या मंगळवारी (26 सप्टेंबर) भारत सिंगापूरला टक्कर देणार आहे.
ICC कडून वनडे वर्ल्डकपच्या बक्षीसांची रक्कम जाहीर, विजेत्या संघाला मिळणार 33 कोटी
दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. नेमबाजी प्रकारात पहिले पदक जिंकत या स्पर्धेत भारताने विजयी वाटचाल सुरू केली. पुरुष दुहेरी लाइटवेट प्रकारातही पदके जिंकली. ही दोन्ही पदके रौप्य आहेत. महिलाच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारताने रौप्यपदक जिंकले. रोईंगमध्ये दुसरे पदक जिंकले. भारताच्या रमिला, मेहुली आणि आशी या महिला खेळाडूंनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकले.