Asian Games 2023 : भारताने खाते उघडले; नेमबाजी आणि रोईंग प्रकारात रौप्यपदकांवर कोरलं नाव

Asian Games 2023 : भारताने खाते उघडले; नेमबाजी आणि रोईंग प्रकारात रौप्यपदकांवर कोरलं नाव

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. नेमबाजी प्रकारात पहिले पदक जिंकत या स्पर्धेत भारताने विजयी वाटचाल सुरू केली. पुरुष दुहेरी लाइटवेट प्रकारातही पदके जिंकली. ही दोन्ही पदके रौप्य आहेत. महिलाच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारताने रौप्यपदक जिंकले. रोईंगमध्ये दुसरे पदक जिंकले. भारताच्या रमिला, मेहुली आणि आशी या महिला खेळाडूंनी 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक जिंकले. या तिन्ही खेळाडूंनी मिळून 1886 गुण मिळवले. ज्यामध्ये रमिताला 631.9, मेहुली 630.8 तर आशी हिला 623.3 गुण मिळाले.

नेमबाजी प्रकारात भारताच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. पुरुषांच्या लाइटवेट डबल स्कल्स प्रकारात अर्जुन सिंह आणि जाट सिंह यांनी 6:28:18 या वेळेसह रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत भारताच्या तुलनेत चीनच्या खेळाडूंनी सरस कामगिरी केली. नेमबाजी प्रकारात चीनच्या खेळाडूंनी सुवर्णपदकाची कामाई केली.

IND vs AUS : पराभव ऑस्ट्रेलियाचा पण, धक्का पाकिस्तानला; नेमकं काय घडलं ?

या स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघाने जबरदस्त खेळ करत रौप्यपदक निश्चित केले. उपांत्य फेरीतील सामन्यात टीम इंडियाने बांग्लादेशचा पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत बांग्लादेशने फक्त 51 धावा केल्या. या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना दोन विकेट गमावत भारताने विजय साकार केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच सहभाग घेतला आहे. आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. रौप्यपदकांची कमाई करत चांगले यश मिळवले आहे. यानंतर आता 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यात विजयी होणाऱ्या संघाविरुद्ध टीम इंडियाचा सामना होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube