Download App

Asian Games 2023 : टीम इंडियाच! मलेशियाला पराभवाची धूळ चारत सेमी फायनलमध्ये धडक

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) पहिल्याच सामन्यात भारताच्या महिला क्रिकेट संघाने जबरदस्त कामगिरी केली. स्पर्धेतील उपांत्य पूर्व सामन्यात टीम इंडियाने मलेशियाचा (Malaysia) पराभव करत सेमी फायनलमध्ये एन्ट्री घेतली. या सामन्यात शेफाली वर्माने जबरदस्त फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने (Team India) 15 ओव्हरमध्ये 173 धावा केल्या. त्यानंतर पाऊस झाला त्यामुळे हा सामना 15 ओव्हर्सचा करण्यात आला. मलेशियाची फलंदाजी सुरू झाल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. यानंतर मात्र सामना सुरू होऊ शकला नाही. त्यानंतर भारताला विजयी घोषित करण्यात आले. आशियाई क्रीडा स्पर्धेत नऊ वर्षांनंतर क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारत पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी होत आहे. पुरूष आणि महिला दोन्ही संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

Asian Games 2023 : भारताचा पराक्रम ! थरारक सामन्यात दक्षिण कोरियाला लोळवलं

भारतीय संघाला रँकिंगच्या आधारावर क्वार्टर फायनल सामन्यात संधी मिळाली होती. तर दुसरीकडे मलेशियाने (Asian Games 2023) हाँगकाँग संघाला 22 धावांनी पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये एन्ट्री मिळवली होती. या सामन्यात स्मृती मानधनाने संघाचे नेतृत्व केले. मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मानधना आणि शेफाली यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघींनी 57 धावांची भागीदारी केली. सहाव्या ओव्हरमध्ये स्मृती मानधना बाद झाली. एका बाजूला जबरदस्त खेळ करत शेफालीने अर्धशतक पूर्ण केले.

दरम्यान, याआधी भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघानेही नेत्रदीपक कामगिरी करत रौप्यपदक विजेत्या दक्षिण कोरियाला पराभवाचा धक्का दिला. या थरारक सामन्यात एक वेळ अशी आली होती की भारत जिंकणार नाही असेच वाटत होते. भारतीय संघ 0-2 असा पिछाडीवर पडला होता.  मात्र त्यानंतर दमदार खेळ करत संघाने पुन्हा कमबॅक केले आणि हा सामना 3-2 अशा फरकाने खिशात टाकला.

IND vs AUS : एकदिवसीय मालिकेत अश्विन 21 महिन्यांनी परतला, रोहित-आगरकरचा नेमका प्लॅन आहे तरी काय?

Tags

follow us