IND vs AUS : एकदिवसीय मालिकेत अश्विन 21 महिन्यांनी परतला, रोहित-आगरकरचा नेमका प्लॅन आहे तरी काय?

IND vs AUS : एकदिवसीय मालिकेत अश्विन 21 महिन्यांनी परतला, रोहित-आगरकरचा नेमका प्लॅन आहे तरी काय?

India squad announced for ODI series against Australia : आशिया कपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. बीसीसीआयने (BCCI)ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडिया (Indian Cricket team)आणि ऑस्ट्रेलिया संघात येत्या 22 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.या मालिकेमधील पहिल्या दोन सामन्यांसाठी कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि विराट कोहली या दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. या दोन सामन्यांमध्ये केएल राहुल टीम इंडियाची धुरा सांभाळणार आहे. टीम इंडियातील विशेष बाब म्हणजे रविचंद्रन अश्वीनला (Ravichandran Ashwin)संघात स्थान दिलं आहे. अश्वीन तब्बल 20 महिन्यानंतर संघात परतला आहे.

Abdul Sattar : तुम्ही प्रत्येक मंत्रिमंडळात कसे? अब्दुल सत्तारांनी उत्तर देताच हशा पिकला

त्यानंतर या मालिकेत तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यामध्ये मात्र रोहित शर्मा(Rohit Sharma), विराट कोहली आणि हार्दिक पांड्याचं टीम इंडियात परतणार आहेत. आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या तोंडावर पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

Women’s Reservation Bill : मोदींच्या मास्टरस्ट्रोकने बदलणार लोकसभेच्या 160+ जागांवरील गणित

असं असलं तरी या खेळाडूंच्या यादीमध्ये 37 वर्षीय अश्वीनचे नाव आश्चर्यकारकच आहे. कारण 2017 मध्ये अश्विनला टीम इंडियाच्या एकदिवसीय संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर तो फक्त दोनच एकदिवसीय सामने खेळला. 2022 मध्ये अश्वीनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली. अश्विन कसोटीमध्ये टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला असला तरी एकदिवसीय आणि टी-20 मध्ये तो फार कमी सामने खेळला आहे.

2017 मध्ये टीम इंडियाच्या एकदिवसीय आणि टी-20 संघातून वगळल्यानंतर, अश्वीनने 2021 टी-20 विश्वचषक खेळला. मात्र त्याला तीन सामन्यांमध्ये सहा विकेट घेता आल्या आणि टीम इंडियाला उपांत्य फेरीतही प्रवेश मिळवता आला नाही. यानंतर अश्विनला भारतीय टी-20 संघात नियमित संधी मिळाली, पण तो 16 सामन्यांमध्ये फक्त 14 विकेट घेऊ शकला. त्याचा इकॉनॉमी रेट सातच्या वर होता. अशा परिस्थितीत 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर त्याला संघातून वगळण्यात आले.

अश्विनने 2022 च्या T20 विश्वचषकातील सहा सामन्यांमध्ये सहा विकेट घेतल्या आणि त्याचा इकॉनॉमी रेट आठपेक्षा जास्त होता. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने एक महत्त्वाची धाव काढली, पण याशिवाय फलंदाजीत तो काही विशेष करु शकला नाही. आता त्याला वनडे वर्ल्ड कपमध्ये पुन्हा संधी मिळू शकते.

अश्विनला संधी का दिली जातेय?
एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. त्या बहुतेक मैदानातील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. भारताच्या सध्याच्या विश्वचषक संघात तीन फिरकी गोलंदाज आहेत. तिघेही डाव्या हाताचे आहेत. जडेजा आणि अक्षर प्रत्येक बाबतीत जवळपास सारखेच आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा फिरकी खेळपट्टीवर तीन फिरकी गोलंदाजांना संधी दिली जाईल, तेव्हा अक्षर आणि जडेजा यांना एकत्र खेळणे कठीण होईल.

आशिया चषकातही अक्षरला काही विशेष करता आले नाही. आता अक्षर दुखापतग्रस्त असल्यामुळे तो फिट होणे कठीण आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी अश्विनला तिसरा फिरकीपटू म्हणून तयार ठेवण्याचा प्लॅन आहे.

अक्षर पटेल योग्य वेळेत फिट न झाल्यास त्याच्या जागी अश्वीनला विश्वचषक संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. अश्विन सक्षम फलंदाजी करण्यासाठी सक्षम मानला जातो. अश्विन खास करुन डावखुऱ्या फलंदाजांना जेरीस आणतो. या सर्व कारणांमुळेच टीम इंडियामध्ये अश्विनला स्थान दिल्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube