Asian Games : नागपुरच्या पठ्ठ्यानं भेदलं तिरंदाजीत ‘सुवर्ण’; वाचा कोण आहे ओजस देवतळे

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा जलवा कायम असून, 100 हून अधिक पदकं देशाच्या नावावर करत भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आहे. तिरंदाजीत नागपुरच्या ओजस देवताळे याने लक्ष्य भेदत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. ओजसच्या स्पर्धेतील या कामगिरीनंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुक केले जात असून हे त्याचे तिसरे सुर्वण पदक आहे. मोदी- शिंदेंकडून कौतुक […]

Letsupp Image   2023 10 07T120024.393

Letsupp Image 2023 10 07T120024.393

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा जलवा कायम असून, 100 हून अधिक पदकं देशाच्या नावावर करत भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आहे. तिरंदाजीत नागपुरच्या ओजस देवताळे याने लक्ष्य भेदत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. ओजसच्या स्पर्धेतील या कामगिरीनंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुक केले जात असून हे त्याचे तिसरे सुर्वण पदक आहे.

मोदी- शिंदेंकडून कौतुक

तिरंदाजीत सुवर्ण पदक पटकावल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ओजसचे कौतुक केले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. यात त्यांनी दृढ संकल्प आणि एकाग्रता यामुळे ओजसने चाांगली कामगिरी केली आहे. त्याने सूवर्ण पदक जिंकून देशाचा गौरव वाढवल्याचे ट्विट मोदींनी केले आहे.

मराठी पाऊल पडते पुढे…

पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीदेखील ट्विट करत ओजसचे कौतुक केले आहे. यात त्यानी मराठी पाऊल पडते पुढे असे म्हटले आहे. भारतीय तिरंदाज ओजस देवतळे याने चीन येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी विभागात अंतिम फेरीत भारतीय तिरंदाज अभिषेक वर्माचा पराभव करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

ओजस देवतळेने एकाग्रता आणि मोठ्या जिद्दीने यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तब्बल तीन सुवर्णपदकांची लयलूट केली आहे. ओजसच्या ऐतिहासिक कामगिरीचा आम्हा तमाम भारतवासिंयांना सार्थ अभिमान असल्याचे म्हटत तिरंदाजीतील भावी कारकिर्दीसाठी शिंदेंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

ओजसला लहापणापासून तिरंदाजीमध्ये आवड होती. यासाठी त्याने अपार कष्ट घेतले असून, त्याने आतापर्यंत शालेय, राज्य आणि देशपातळीवर अनेक पदकं पटकावली आहेत. त्यानंतर आता त्याने आशियाई स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत देशाचा नैवलौकिक वाढवला आहे. याआधी ओजसने आर्चरी मिक्स कंपाऊंडमध्ये भारताला सूवर्ण पदक मिळवून दिलं होते.

Exit mobile version