आशियाई कुस्ती चाचणीसाठी अंडर-17, 23 चं वेळापत्रक जाहीर

Wrestling : दिल्लीतील जंतरमंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर कुस्तीपटूंचं आंदोलन (Wrestlers’ movement)सुरु आहे. एकीकडं हे आंदोलन सुरु असतानाच एडहॉक समितीने (Ad Hoc Committee)अंडर-17 आणि 23 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपसाठीच्या (Asian Wrestling Championship) चाचणीचे वेळापत्रक जारी केले आहे. किर्गिस्तानमधील बिश्केक येथे 17 ते 20 मे दरम्यान स्पर्धेच्या चाचण्या होणार आहेत. त्यामध्ये दररोज दोन ते तीन वजन श्रेणीच्या चाचण्या घेतल्या […]

Wressling

Wressling

Wrestling : दिल्लीतील जंतरमंतरच्या (Jantar Mantar)मैदानावर कुस्तीपटूंचं आंदोलन (Wrestlers’ movement)सुरु आहे. एकीकडं हे आंदोलन सुरु असतानाच एडहॉक समितीने (Ad Hoc Committee)अंडर-17 आणि 23 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपसाठीच्या (Asian Wrestling Championship) चाचणीचे वेळापत्रक जारी केले आहे. किर्गिस्तानमधील बिश्केक येथे 17 ते 20 मे दरम्यान स्पर्धेच्या चाचण्या होणार आहेत. त्यामध्ये दररोज दोन ते तीन वजन श्रेणीच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. एडहॉक समिती सदस्य भूपेंद्र सिंह बाजवा (Bhupendra Singh Bajwa)हेही सोनीपतमध्ये उपस्थित राहणार आहेत.

“तू खूप…”; गायिका आर्या आंबेकरने मातृदिनानिमित्त सोशल मीडियावर लिहिली खास POST

17 वर्षांखालील आणि 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेच्या चाचण्या यावेळी सोनीपतच्या बहलगढ येथील साई केंद्र आणि पंजाबमधील पटियाला येथील केंद्रावर होणार आहेत. त्यामध्ये सोनीपत आणि ग्रीको-रोमन आणि पटियाला येथे महिला कुस्तीपटूंसाठी फ्रीस्टाइल श्रेणीसाठी चाचण्या घेण्यात येणार आहेत.

या चाचणीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. एडहॉक समिती सदस्य भूपेंद्र सिंग बाजवा, SAI कुस्ती संघाचे मुख्य प्रशिक्षक जगमिंदर सिंग आणि अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू रमेश कुमार गुलिया सोनीपत येथील चाचणी प्रक्रियेसाठी निवड समितीमध्ये उपस्थित राहणार आहेत.

पटियाला येथे महिला आणि ग्रीको-रोमन कुस्तीपटूंच्या चाचण्यांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते सुमा शिरुर, महासिंग राव आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त अलका तोमर यांचा समावेश करण्यात आला आहे.

Exit mobile version