“तू खूप…”; गायिका आर्या आंबेकरने मातृदिनानिमित्त सोशल मीडियावर लिहिली खास POST
Arya Ambekar’s special post on the occasion of ‘Mother’s Day’ : आज सर्वत्र मातृदिन (mother’s day) साजरा केला जात आहे. या मदर्स डे सेलिब्रेशनमध्ये सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण व्यस्त दिसत आहेत. आईसोबतचा फोटो पोस्ट करून तर कुणी आईविषयी पोस्ट लिहून आईच्या आठवनींना उजाळा दिला आहे. ‘मदर्स डे’च्या निमित्ताने आर्या आंबेकरनेही (Arya Ambekar) खास पोस्ट करत तिच्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत.
गायिका आर्या आंबेकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून आर्या घराघरात पोहोचली. आर्याने अभिनयासोबतच गायनातही नशीब आजमावले. आर्याने तिची आई श्रुती आंबेकर यांच्याकडून गायनाचे धडे घेतले. वयाच्या साडेपाचव्या वर्षी तिने आईसोबत शास्त्रीय गायन शिकायला सुरुवात केली आणि वयाच्या सहाव्या वर्षी पहिली ऑडिशन दिली. म्हणूनच आर्या तिच्या मधुर आवाजाचे संपूर्ण श्रेय नेहमीच तिच्या आईला देते. आता ‘मदर्स डे’च्या निमित्ताने त्याने आपल्या आईसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
जनतेचे मुद्दे घेतल्यानेच काँग्रेस ‘किंग’; काँग्रेसच्या राजकीय रणनितीकारने सांगितले कष्ट
‘मदर्स डे’च्या निमित्ताने आर्याने खास पोस्ट करत तिच्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. “तुला मातृदिनाच्या खुप खूप शुभेच्छा! तू खूप सुंदर आहेस आई ,” असं आर्याने पोस्टमध्ये लिहिले आहे. शुभेच्छा देताना आर्याने स्वतः गायलेले एक खास गाणे तिच्या आईला समर्पित केले आहे. आईचे महत्त्व सांगणारे ‘आई पहिला संस्कार’ हे गाणे चार वर्षांपूर्वी प्रदर्शित झाले होते. हे गाणे आर्याने गायले आहे आणि अरुण सांगोले यांनी लिहिले आहे.
‘आई पहिला संस्कार’ हे संपूर्ण गाणे आईच्या महती सांगते. हे गाणं गात आर्याने आईचे आभार मानून, आईचा सन्मान केला आहे. आर्याने हे गाणे तिच्या आईला समर्पित केले आहे कारण तिच्या आयुष्यातही तिच्या आईचा सर्वात मोठा प्रभाव आहे. आर्या नेहमीच तिच्या आईसोबत वेगवेगळे फोटो शेअर करत असते. यापूर्वी आर्याने असे काहीतरी पोस्ट केले होते, तिने लिहिलं होतं की, ‘आई… माझ्या आयुष्यात तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही.’
दरम्यान, आर्याने ‘मदर्स डे’ निमित्त ‘आई कुठं काय करते’ या मालिकेचे शीर्षक गीत देखील आर्यानेच गायले असल्याने तिच्या अनेक चाहत्यांनी आर्याला सोशल मीडियावर टॅग करत तिच्या मधुर आवाजाचे कौतुक केले.