जनतेचे मुद्दे घेतल्यानेच काँग्रेस ‘किंग’; राजकीय रणनितीकारने सांगितले कष्ट
Karnataka Election result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमताने विजयी झाली आहे. या विजयाचे आता वेगवेगळ्या पध्दतीने विश्लेषण केले जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री सिध्दारमय्या, काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना विजयाचे श्रेय दिले जात आहे. पण काँग्रेसच्या विजयात पडद्याआड असलेल्या काही राजकीय थिंक टँकचा समावेश आहे. त्यातील एक म्हणजे राजकीय रणनितीकार नरेश अरोरा हे होय.
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी 2 नाही, तर ‘या’ 4 नेत्यांमध्ये चुरस, काँग्रेसच कार्याध्यक्षांनी नावंही जाहीर केली
नरेश अरोरा हे टेक्सस्टाईल इंजिनिअर आहेत. ते डिजिटल मार्केटिंगचे तज्ज्ञ आहे. त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याबरोबर कर्नाटक निवडणुकीचे नियोजन केले होते. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अरोरा यांनी काँग्रेसच्या विजयामागील गणितेही सांगितले आहेत. डी. के. शिवकुमार यांच्याबरोबर दोन वर्षांपासून निवडणुकीच्या तयारीला लागलो होते. दोन वर्षां कष्ट घेतल्यानंतर आम्हाला १४० जागा मिळतील, असा अंदाज होता. तो खराही ठरला आहे.
आम्ही लवकर सुरुवात केल्यामुळे आम्हाला वेळही मिळाला. केवळ सोशल मीडियावर अवलंबून राहिलो नाही. मतदारांना भेटण्यासाठी नियोजन केले होते. अनेक मतदारांना आम्हाला भेटता आले. त्यामुळे पक्ष हा जनतेबरोबर संपर्कात राहिला आहे. पेट्रोल, कोविड, महागाईविरोधातील कॅम्पेन आम्ही राबविले आहे. त्यामुळे पक्षाला आम्हाला पुढे नेता आल्याचे अरोरा यांनी सांगितले आहे.
कर्नाटकच्या निवडणुकीत कॉंग्रेसची बाजी, राज ठाकरे म्हणाले; हा ‘त्यांचा’ पराभव…
सोशल मीडियाचा आम्ही वापर केला. केवळ ट्वीट, व्हिडिओ टाकणे म्हणजे प्रचार होत नाहीत. थेट आम्ही ग्राउंड अॅक्टिव्हिटी केल्या. सोशल मीडिया केवळ आमच्यासाठी वाहन होते. कोविडच्या काळात काँग्रेस लसीकरणाविरोधात आहे, असा अपप्रचार केला गेला. तो प्रचार खोडून काढण्यासाठी आम्ही मोहिम राबविली. खासदार, आमदारांनी शंभर कोटी रुपये लसीकरणासाठी जमा केले. परंतु राज्य सरकारने आम्हाला विरोध केला. आम्ही खासगी कॅम्प सुरू करून लसीकरण केल्याचे अरोरा यांनी सांगितले आहे. डी. के. शिवकुमार यांनी त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची मदत घेतली. त्यात पाच हजार विद्यार्थी सहभागी झाले होते, असे अरोरा सांगतात.
भारत जोडो यात्राही महत्त्वाची ठरली आहे. दोनशे किलोमीटर यात्रेमध्ये काँग्रेसचे सर्व नेते सहभागी झाले होते. स्वतः डी. के. शिवकुमार हे यात्रेत दोनशे किलोमीटर चालले होते. आयकर विभागाच्या धाडी पडून आमची एजन्सी घाबरली नाही. आमचे पाचशे लोक आमचे काम करत राहिले आहे. त्याचबरोबर डिजिटल सदस्य नोंदणी केली. त्यात ७८ लाख सदस्य झाले. त्यासाठी डी.के. शिवकुमार स्वतः अनेकदा रेल्वे स्टेशनवर सदस्य नोंदणीसाठी गेले होते.
काँग्रेसचा पाच गँरंटी स्कीमचा जाहीरनामा आधीच ज्येष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करून तयार केला होता. महिलांना दोन हजार रुपये, तरुणांना बेरोजगार भत्ता, मोफत वीज देणे हे आश्वासन दिले होते. ते ही विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. स्थानिक मुद्देही महत्त्वपूर्ण ठरले आहे. तिकीट वाटप आधीच ठरले होते. त्यात उमेदवारापेक्षा पक्षाला किती फायदा होईल, याचा विचार केला होता. या सर्वाचा फायदा झाल्याचे अरोरा यांनी स्पष्ट केले आहे. वोक्कालिंग रिझर्व्हेशनचा मुद्दा होता. स्वतः डी. के. शिवकुमार या समाजाचे असताना त्यांनी त्याला विरोध दर्शविला होता. त्यामुळे डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री झाले पाहिजे, असे अरोरा यांचे मत आहे.