कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी 2 नाही, तर ‘या’ 4 नेत्यांमध्ये चुरस, काँग्रेसच कार्याध्यक्षांनी नावंही जाहीर केली

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी 2 नाही, तर ‘या’ 4 नेत्यांमध्ये चुरस, काँग्रेसच कार्याध्यक्षांनी नावंही जाहीर केली

4 Leaders Tied for CM Post of Karnataka : कर्नाटकात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाले असून कॉंग्रेससाठी सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार (Siddaramaiah and D.K. shivkumar) हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. अशा परिस्थितीत या दोघांपैकी कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आणखी दोन नावांची चर्चा सुरू असल्याचे काँग्रेसचे कर्नाटकचे कार्याध्यक्ष रामलिंगा रेड्डी (Ramalinga Reddy) यांनी सांगितले.

“प्रत्येक पक्षात महत्त्वाकांक्षी नेते असतात. मुख्यमंत्रिपदासाठी फक्त डी.ए. शिवकुमार आणि सिद्धरामय्याच नाही तर एम बी पाटील आणि परमेश्वराही इच्छुक आहेत. पण, त्यापैकी एकच मुख्यमंत्री असेल. त्याचे अधिकार हायकमांडकडे असून आमदारांशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल. मला मंत्रीपद मिळू शकते”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे कर्नाटकचे कार्याध्यक्ष रामलिंगा रेड्डी यांनी दिली.

दरम्यान, कर्नाटकात काँग्रेसला सत्तेची चावी मिळू शकते, पण मुख्यमंत्रीपदाची चांगलीस चुरल निर्माण झाली आहे. कर्नाटकात काँग्रेसने या निवडणुकीसाठी चांगलीच तयारी केली होती. त्यावेळी सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा नंतर विचार करू, आधी निवडणूक लढवू, असे हायकमांडला सांगितले होते. यासोबतच मुख्यमंत्रिपदाचा निर्णय हायकमांड घेणार असल्याचेही ठरलं होतं. त्यानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विजयी आमदारांची बैठक बोलावली आहे. या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्यांबाबत चर्चा होणार आहे. मल्लिकार्जुन आमदारांशी चर्चा करूनच निर्णय घेतील.

.. म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंना भाजपाच्या मदतीने धडा शिकवला; शिरसाटांनी सांगितला ‘तो’ किस्सा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करायची याचा निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे. याबाबत माहिती देताना कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले की, ‘बंगळुरू येथील एका हॉटेलमध्ये ही बैठक सायंकाळी ६ वाजता होणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय काँग्रेसचे स्थानिक नेते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे सोपवतील, असे दिसते. आज (14 मे) मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होण्याची शक्यता धूसर आहे. मात्र सर्व आमदारांचे मत पक्षनेते जाणून घेतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube