Download App

डेव्हिड वॉर्नरची वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी घोषणा

David warner : नवीन वर्षाच्या (New Year)पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा (Australia)दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने David warnerजगातील क्रिकेटप्रेमींना (Cricket lovers)आश्चर्याचा धक्का दिला आहे. सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत करत असतानाच वॉर्नरने हा निवृत्तीची घोषणा केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan)कसोटी मालिकेनंतर वॉर्नर कसोटी(Test match) खेळणार नाही. 37 वर्षाच्या डेविड वॉर्नरने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये (World Cup)सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळं तो किमान दोन तीन वर्ष खेळत राहिल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आता पत्रकार परिषदेत डेव्हिडनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

प्राणप्रतिष्ठेआधीच लुटारूंचा बाजार, देणगीच्या नावाखाली फसवणूक; विश्व हिंदू परिषदेचे सावधगिरीचे आवाहन

वॉर्नरने सांगितले की, 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन म्हणून 50 षटकांच्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला होता. आपल्याला पत्नी कँडिस आणि त्यांच्या तीन मुली, आयव्ही, इस्ला आणि इंडी यांच्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे.

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला: केवळ अंतिम शिक्कामोर्तब बाकी, सुप्रिया सुळे यांचा दावा

त्याचबरोबर वॉर्नर म्हणाला की, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फलंदाजाची गरज असेल तेव्हा आपली निवृत्ती मागे घेऊन संघासाठी उपलब्ध असेल. 2025 मध्ये ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळली जाणार आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. त्यात भारत-ऑस्ट्रेलियामध्ये हा सामना झाला. त्यात ऑस्ट्रेलियानं बाजी मारली होती. त्यातच वॉर्नरने सांगितलं की, आपण कसोटीसह वनडे क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत आहे.

आपण 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये सांगितलं होतं की, भारतात विजय मिळवणं खूप मोठा पराक्रम असणार आहे. त्यानंतर आम्ही ते करुन दाखवलं, त्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे.

डेव्हिडने 161 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 45.30 च्या सरासरीनं आणि 97.26 च्या स्ट्राईक रेटनं 6 हजार 932 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 22 शतकं आणि 33 अर्धशतकं केली आहेत. त्यानं 733 चौकार आणि 130 षटकारही ठोकले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत त्याचा सहावा क्रमांक आहे.

follow us