Aus VS Pak : एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) 2023 चा 18 वा सामना आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानपुढे 367 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र पाकिस्तानने चांगली सुरूवात करून देखील या सामन्यात केवळ 305 च धावा करू शकला. त्यामुळे विश्वचषक 2023 मध्ये पाकिस्तानला दुसरा पराभव स्विकारावा लागला आहे. या अगोदर भारताने देखील पाकिस्तानला हरवले आहे.
सलग दोन विजय आणि पराभवही…
विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सुरूवातीचे सामने हरल्यानंतर सलग दुसरा विजय विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने सुरुवातीला दोन विजय मिळवल्यानंतर सलग दोन पराभवाला सामोरे जावं लागलं आहे.
Namo Bharat : देशाला मिळाली पहिली ‘नमो भारत’ रॅपिड ट्रेन; काय आहेत याची वैशिष्ट्ये?
सामन्यात सुरूवातीला ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करत डेविड वॉर्नर (163) आणि मिचेल मार्श (121) या शतकी खेळींनंतर गोलंदाजांच्या जोरावर पाकला पराभूत केलं. एम. चिन्नास्वामी स्टेडिअम या छोट्या ग्राऊंडवर पाकिस्तानने टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करायला दिली. त्यानंतर वॉर्नर आणि मार्शच्या भागीदारीने 203 चेंडूत 259 धावा केल्या. या जोरदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानपुढे नऊ विकेटमध्ये 367 धावांचा डोंगर उभा केला होता. तर पाकिस्तानने चांगली सुरूवात करूनही 45.3 ओवरमध्ये 305 च धावा केल्या. त्यामुळे त्यांना धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे.
“माझ्यासमोर एक अन् कोर्टासमोर वेगळीच भूमिका” : ठाकरे गटावर राहुल नार्वेकरांची नाराजी