Namo Bharat : देशाला मिळाली पहिली ‘नमो भारत’ रॅपिड ट्रेन; काय आहेत याची वैशिष्ट्ये?
Namo Bharat : आज ‘नमो भारत'(Namo Bharat) या ट्रेनचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या ट्रेनने भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक महत्त्वाचा बदल होणार आहे. दिल्ली ते मेरठ दरम्यान ही ट्रेन 84 किमी धावणार आहे. तसेच तीच्या साहिबाबाद ते दुहाई पर्यंतच्या टप्प्याचं यावेळी मोदींनी उद्धाटन केलं आहे. प्रवाशांसाठी उद्या 21 ऑक्टोबरपासून ही ट्रेन सुरू होणार आहे.
काय आहे ‘नमो भारत’ ट्रेनची खासियत?
नमो भारत ट्रेन 180 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने धावू शकते. तर जेव्हा तिची ट्रायल घेतली तेव्हा ती 146 किमी प्रति तास एवढ्या वेगाने धावली होती. त्यात वाकणारे सीट मोठ्या खिडक्या तसेच डिजिटल स्क्रिन्स देखील देण्यात आल्या आहेत. ज्यावर ट्रेन आता कुठे आहे. कधी पोहचणार आहे. याची माहिती मिळणार आहे.
तसेच ही ट्रेन बुलेट आणि मेट्रोसारखी दिसते. दरवाजे देखील मेट्रोसारखेच उघडतात. तर तिचे सीट राजधानी ट्रेनप्रमाणे लग्झरीअस आहेत. सध्या यात 6 कोच आहेत. एक कोच महिलांसाठी आरक्षित असणार आहे. तसेच एक प्रीमियम कोच देखील आहे. ज्यामध्ये रिक्लाईनिंग सीटे, कोट हुक, मॅगझीन होल्डर आणि फुटरेस्ट यांसारख्या सुविधा असणार आहे.
आमदार अपात्रता प्रकरण : शिंदे अन् ठाकरे दोघांनाही धक्का; याचिका एकत्रिकरणावर नार्वेकरांचा निर्णय
त्याचबरोबर मोफत वाय-फाय, मोबाईल चार्जिंग पॉईंट, सामन ठेवण्यासाठी जागा, इन्फोटेक सिस्टम, उभे राहणाऱ्या प्रवाशांसाठी हॅंड होल्डर, तर हे सीट्स 2X2 असणार आहेत. तर फक्त 30 सेकेंडसाठी एका स्टेशनवर थांबणार आहे. सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत ती चालणार आहे. तर तिचं भाड हे 20 रूपयांपासून 50 रूपयांपर्यंत असणार आहे. तर प्रीमियम क्लाससाठी 40 रुपये ते 100 रुपयांदरम्यान तिकीट असणार आहे.
तर या ट्रेनचा उर्वरित टप्पा पूर्ण झाल्यावर त्याला एकुण 30,274 कोटींचा खर्च लागणार आहे. तर या ट्रेनमुळे दिल्ली ते मेरठ दरम्यानचा 2 अडिच तासांचा प्रवास 55-60 मिनिटांत होणार आहे. 2025 मध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे. 8 मार्च 2019 मध्ये उद्धाटन करण्यात आलं होतं.