Download App

AUS vs WI : ऑस्ट्रेलियाचा विंडीजला दणका! तिसऱ्या सामन्यात 41 चेंडूतच चारली धूळ; मालिकाही जिंकली

AUS vs WI ODI Series : ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची (AUS vs WI ODI Series) मालिका पार पडली. या तिन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने विंडीजला धूळ चारली. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात तर ऑस्ट्रेलियाने (Australia vs West Indies) फक्त 6.5 ओव्हरमध्येच सामना खिशात टाकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला. ऑस्ट्रेलियाच्या धारदार गोलंदाजीपुढे वेस्टइंडिजच्या फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली. फक्त 87 धावांवर संघ ऑलआऊट झाला. वेस्टइंडिज संघाने दिलेले आव्हान फक्त 6.5 ओव्हरमध्ये पार करत ऑस्ट्रेलियाने शेवटचा सामनाही जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने विंडीजला 3-0 असा व्हाईटवॉश दिला.

AUS vs WI : विंडीजने ‘गाबा’ जिंकलं! थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव; मालिकाही बरोबरीत

याआधीच्या कसोटी मालिकेत वेस्टइंडिजने गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाचा नामुष्कीजनक पराभव केला होता. मालिका बरोबरीत राखण्यातही विंडीज संघाला यश मिळाले होते. यानंतर ऑस्ट्रेलियाने या पराभवाचा वचपा वनडे मालिकेत काढला. पहिले दोन सामने जिंकले. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात वेस्टइंडिज संघाला अवघ्या 87 धावांवर ऑलआऊट करून 6.5 ओव्हर्समध्येच सामना जिंकला.

वेस्टइंडिजकडून फलंदाजी करताना एलिक एथानाजेने सर्वाधिक 35 धावा केल्या. या फलंदाजाचा अपवाग वगळता अन्य एकही फलंदाज टिकू शकला नाही. जॉन ओटली 8, कीसी कार्टी 10, कर्णधार शाय होपने फक्त 4 रन केले. या अतिशय खराब कामगिरीमुळे वेस्टइंडिजचा डाव 24.5 ओव्हरमध्येच आटोपला.  या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जेवियर बार्टलेटने शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 विकेट्स घेतल्या. अॅडम झाम्पा आणि लँस मॉरिस यांनीही त्याला चांगली साथ देत प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. सीन अॅबॉटने एक विकेट घेतली.

वेस्टइंडिजने दिलेल्या या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी फक्त 41 चेंडूत विजय साकारला. जॅक फ्रेजर आणि जोश इंग्लिसने आक्रमक सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी केली. जोश इंग्लिसने नाबाद 35 धावा केल्या. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही जिंकली आहे.

INDW vs AUSW : भारताला डबल धक्का! महिला संघाचाही ऑस्ट्रेलियाकडून पराभव

follow us

वेब स्टोरीज