AUS vs WI : विंडीजने ‘गाबा’ जिंकलं! थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव; मालिकाही बरोबरीत

AUS vs WI Test : ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाबामध्ये ऑस्ट्रेलियालाच (AUS vs WI Test) पराभवाचा धक्का बसला आहे. टीम इंडियानंतर वेस्ट इंडिज संघाने विश्वविजयी कांगारूंना पराभवाचा धक्का दिला. दोन्ही संघात झालेल्या थरारक सामन्यात विंडीजने (West Indies) 8 धावांनी विजय मिळवला गाबा कसोटी जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. या सामन्यात वेस्टइंडिजचा गोलंदाज […]

AUS vs WI : विंडीजने 'गाबा' जिंकलं! थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव; मालिकाही बरोबरीत

AUS vs WI : विंडीजने 'गाबा' जिंकलं! थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव; मालिकाही बरोबरीत

AUS vs WI Test : ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गाबामध्ये ऑस्ट्रेलियालाच (AUS vs WI Test) पराभवाचा धक्का बसला आहे. टीम इंडियानंतर वेस्ट इंडिज संघाने विश्वविजयी कांगारूंना पराभवाचा धक्का दिला. दोन्ही संघात झालेल्या थरारक सामन्यात विंडीजने (West Indies) 8 धावांनी विजय मिळवला गाबा कसोटी जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. या सामन्यात वेस्टइंडिजचा गोलंदाज शामर जोसेफने (Shamar Joseph) भेदक गोलंदाजी केली. त्याने एकट्यानेच दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाची (Australia) फलंदाजी उद्धवस्त केली. जोसेफला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

विश्वविजेता होण्याचंं स्वप्न भंगलं! नेदरलँड्ने जिंकला पहिला हॉकी वर्ल्डकप; भारताचा पराभव

या सामन्यात जोसेफने दमदार गोलंदाजी केली. विशेष म्हणजे हा गोलंदाज दुसरीच कसोटी खेळत होता. या सामन्यात त्याच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याला काही वेळासाठी मैदानही सोडावे लागले होते. त्यानंतर गोलंदाजीसाठी मात्र जोसेफ मैदानात आला. या सामन्यात त्याने जबरदस्त गोलंदाजी करत वेस्टइंडिजच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दोन्ही संघातील सामना दिवस रात्र या प्रकारात खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करत वेस्टइंडिजने 311 धावा केल्या. विंडीजच्या डावात जोशुआ दे सिल्वाने सर्वाधिक 79 तर कावम हॉजने 71 धावा केल्या. यानंतर गोलंदाजी करत वेस्टइंडिजने ऑस्ट्रेलियाला 289 धावात ऑल आउट केले होते. पहिल्या डावात विंडीजला 20 धावांची आघाडी मिळाली होती. या डावात जोसेफने 4 तर केमार रोचने 3 विकेट्स घेतल्या होत्या.

दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजला फक्त 193 धावा करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया सहज विजयी होईल असे वाटत होते. मात्र शामर जोसेफच्या घातक गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी फोडून काढली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने एकाकी झुंज देत 91 धावा केल्या तर कॅमेरून ग्रीनने 42 धावा करत त्याला साथ दिली. परंतु,सामना जिंकण्यासाठी फक्त आठ धावांची गरज असताना जोसेफच्या एका चेंडूवर हेजलवूड शून्यावर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला.

क्रिकेटमध्ये खळबळ! अंमली पदार्थ सेवनाचा आरोप खरा ठरला; झिम्बाब्वेच्या ‘या’ 2 खेळाडूंवर बंदी

Exit mobile version