विश्वविजेता होण्याचंं स्वप्न भंगलं! नेदरलँड्ने जिंकला पहिला हॉकी वर्ल्डकप; भारताचा पराभव
FIH Hockey Women World Cup : ओमानची राजधानी मस्कत येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या महिला हॉकी विश्वचषकात (FIH Hockey Women World Cup ) नेदरलँड्सच्या संघाने जबरदस्त खेळ करत भारतीय महिला संघाचा पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाला 7-2 असा पराभव स्वीकारावा लागला. या विश्वचषकातील नेदरलँड्स हा पहिला विजेता ठरला आहे. एफआयएचने पहिल्यांदाच या विश्वचषकाचे आयोजन केले होते. दोन्ही संघात काल अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात नेदरलँड्सने भारतीय महिला हॉकी संघाचा 7-2 अशा मोठ्या फरकाने पराभव केला.
नेदरलँड्सकडून जेनेक वान डी वेने हिने दुसऱ्या मिनिटाला पहिला गोल करत आघाडी घेतली. पहिल्या हाफमध्ये बेंटे वान डेर वेल्टने दोन गोल करत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. लाना कालसे, सोशा बेनिंगा आणि जेनेक वान डी वेने यांनी पहिल्या हाफमध्ये प्रत्येकी एक गोल करत 6-0 अशी विजयी आघाडी घेतली.
INDW vs AUSW : वनडेनंतर टी 20 मालिकाही गमावली; अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी
यामुळे भारतीय संघ मागे ढकलला गेला होता. ज्योती छत्री हिने विसाव्या मिनिटाला गोल करत खाते उघडले. ऋतुजा दादासो हिने 23 व्या मिनिटाला आणखी एक गोल केला. त्यामुळे सामन्यातील भारताचे आव्हान जिवंत राहिले. लाना कालसे हिने परत 27 व्या मिनिटाला आणखी एक गोल करत भारतीय संघाचा पराभव निश्चित केला. जेनेक वान डी वेने, बेंटे वान डेर वेल्ट आणि लाना कालसे या तिघींच्या दमदार कामगिरीच्या बळावर नेदरलँड्स संघाने पहिल्या विश्ववचषकावर नाव कोरलं.
याआधी भारतीय महिला संघाने उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा 6-3 असा पराभव केला होता. त्यानंतर अंतिम सामन्यात ज्योती आणि ऋतुजा यांच्या व्यतिरिक्त एकाही खेळाडूला विशेष काही करता आले नाही. सेमीफायनलमध्ये अक्षता ढेकाळे, मारियाना कुजूर, मुमताज खान, ऋतुजा, ज्योत आणि अजिमा कुजूर यांनी गोल केले होते. परंतु, अंतिम सामन्यात या खेळाडूंना विशेष काही करता आले नाही. त्यामुळे भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला.
INDW vs AUSW : सामनाही गेला मालिकाही गमावली; दुसऱ्या सामन्यात अवघ्या 3 धावांनी भारताचा पराभव