INDW vs AUSW : सामनाही गेला मालिकाही गमावली; दुसऱ्या सामन्यात अवघ्या 3 धावांनी भारताचा पराभव
INDW vs AUSW : कालचा दिवस भारतीय महिला क्रिकेट टीमसाठी (INDW vs AUSW) अनलकी ठरला. मुंबईतील वानखेड स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे, भारतीय संघानी ऑस्ट्रेलियाला जोरदार टक्कर दिली पण ही झुंज अपयशी ठरली. अवघ्या तीन धावांनी संघाचा पराभव झाला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील भारताचा हा सलग दुसरा पराभव होता. या पराभवाबरोबरच भारताने मालिकाही गमावली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे.
INDW vs AUSW : भारताला डबल धक्का! महिला संघाचाही ऑस्ट्रेलियाकडून पराभव
प्रथम नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 258 धावा केल्या होत्या. यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या महिला खेळाडूंना जिगरबाज खेळ केला. ऑस्ट्रेलियाला जशास तसे प्रत्युत्तर दिले. मात्र अखेरच्या क्षणी विजयासाठी फक्त तीन धावा कमी पडल्या. ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्या सामन्यावर नाव कोरले आणि मालिकाही जिंकली. आता तिसरा सामना फक्त औपचारिकतेचा राहिला आहे. हा सामना भारताने जिंकला तरी काहीच फरक पडणार नाही. तिसरा सामना 2 जानेवारी रोजी होणार आहे.
या सामन्यात यास्तिका भाटियाने 14 रन केले. त्यानंतर स्मृती मंधाना 34, जेमिमा रॉड्रिग्ज 55 आणि हरमनप्रित कौर हीने 5 रन केले. मात्र या खेळाडूंची कामगिरी भारताला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. फक्त तीन धावा कमी पडल्या. यानंतर आता पुढील सामना 2 जानेवारी रोजी होणार आहे. याआधी पहिला सामनाही वानखेडे स्टेडियमवरट झाला होता. या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.
Team India : सलग दहा विजय, फायनलध्ये धडक; पडद्यामागचा ‘हिरो’ निवृत्तीच्या वाटेवर
पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 8 गडी गमावत 282 धावा केल्या होत्या. भारताकडून जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक 82 धावा केल्या. या खेळीत तिने 7 चौकार मारले. यास्तिका भाटिया (49), रिचा घोष (21), आणि दिप्ती शर्माने 21 धावा केल्या. दरम्यान, कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत मात्र संघाने जोरदार कमबॅक केले आहे. यानंतर दुसरा एकदिवसीय सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकाही खिशात टाकली.