Team India : सलग दहा विजय, फायनलध्ये धडक; पडद्यामागचा ‘हिरो’ निवृत्तीच्या वाटेवर

Team India : सलग दहा विजय, फायनलध्ये धडक; पडद्यामागचा ‘हिरो’ निवृत्तीच्या वाटेवर

Team India : विश्वचषकात सलग दहा सामने जिंकून टीम इंडियाने (World Cup 2023) दिमाखात फायनलमध्ये एन्ट्री केली. येथे मात्र नशीबाची साथ मिळाली नाही आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. ऐन महत्वाच्याच सामन्यात संघाने कच खाल्ली अन् अगदीच सोपा विजय ऑस्ट्रेलियाला मिळाला. या पराभवाची चर्चा सगळीकडे होत असतानाच असाच एक पैलू आहे ज्यावर कुणाचेच लक्ष (Rahul Dravid) गेले नाही. तो म्हणजे राहुल द्रविड. विश्वचषकाच्या आधीपासूनत टीम इंडिया (Team India) सरस कामगिरी करत आहे. द्रविडने ज्यावेळी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली. सुरुवातीच्या दिवसात तोही अडखळला. काही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे टीकाही सहन करावी लागली. पण, नंतर मात्र द्रविडने संघाची नस ओळखली. त्यानुसार संघ तयार केला. त्याचे चांगले परिणाम दिसलेही.

मैदानाच्या बाहेरही त्याने जबाबदारीपासून कधीच पळ काढला नाही. सामना गमावल्यानंतरही द्रविड नेहमीच संघाच्या कर्णधाराबरोबर मीडियासमोर उभा दिसला. वर्ल्डकप गमावल्यानंतर रोहित शर्मा रडत होता बाकीचे खेळाडूही निराश झाले होते. तेव्हा द्रविडच प्रसारमाध्यमांना सामोरा गेला. तसे पाहिले तर हे खूप कठीण काम होते. द्रविड 2007 मध्ये जेव्हा भारतीय संघाचा कर्णधार असताना असाच एक कठीण प्रसंग आला होता. विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेने भारताचा 69 धावांनी पराभव केला होता. बांग्लादेशविरुद्ध पराभव झाल्यानंतर भारताचे आव्हानच संपुष्टात आले. यानंतर सहाच महिन्यात द्रविडचे कर्णधारपदही काढून घेण्यात आले.

Rohit Sharma : आता माझा विचार करु नका : रोहितचा सिलेक्टर्संना मेसेज, दिले निवृत्तीचे संकेत

यानंतर असाच प्रसंग 2023 मध्ये आला. यावेळी द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. पराभवानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांमा सामोरे जाणे कठीण असते. पण, ही कामगिरी त्याने पार पाडली. पत्रकारांनी विचारलेल्या तिखट प्रश्नांवरही द्रविडने तितक्याच शांतपणे उत्तरे दिली ज्यासाठी तो ओळखला जातो. द्रविडचा हा कार्यकाळ दोन वर्षांचा होता. या काळात द्रविडने टीम इंडियाचा चेहरामोहराच बदलून टाकला. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात संघाला अव्वल बनवण्याचे काम त्यांनी केले. मात्र या कार्यकाळात मोठ्या स्पर्धांत संघाला यश मिळवता आले नाही हेही तितकेच खरे.

राहुल द्रविडनंतर कोण ?

आता द्रविडनंतर कोण असा प्रश्न विचारला जात आहे. प्रशिक्षकपदासाठी वीवीएस लक्ष्मणचे नाव आघाडीवर आहे. आजपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू झालेल्या टी 20 मालिकेसाठी प्रभारी प्रशिक्षकाची जबाबदारी लक्ष्मणकडे देण्यात आली आहे. यानंतर आता बीसीसीआयला नवीन प्रशिक्षकपदासाठी उमेदवारांचा विचार करावा लागणार आहे. पुढील वर्षातील जानेवारी महिन्याच्या शेवटी इंग्लंड विरोधात पाच कसोटी सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. यासाठी टीम इंडियाचा प्रशिक्षक कोण असेल, पुन्हा राहुल द्रविडचाच विचार होईल की आणखी कुणाला संधी मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

World Cup : दहा वर्षात नऊ नॉकआऊट मॅचेसमध्ये पराभव : टीम इंडिया बनली नवी चोकर्स?

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube