INDW vs AUSW : वनडेनंतर टी 20 मालिकाही गमावली; अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी

INDW vs AUSW : वनडेनंतर टी 20 मालिकाही गमावली; अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी

INDW vs AUSW : ऑस्ट्रेलिया विरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर (INDW vs AUSW) टी 20 मालिकाही गमावण्याची नामुष्की भारतीय महिला संघावर ओढवली आहे. या मालिकेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेत मालिका विजयही साकारला. याआधी एकदिवसीय सामन्यांची मालिकाही ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. त्यानंतर टी 20 मालिकेतही भारतीय संघावर मात करण्याची कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने केली आहे.

IND vs SA : केपटाऊनच्या खेळपट्टीचं रेटिंग आलं समोर, सर्वात लहान कसोटी सामना ठरल्यानंतर प्रश्न 

या सामन्यात भारतीय संघाने 20 ओव्हर्समध्ये 148 टार्गेट ऑस्ट्रेलियाला दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या संघाने दमदार सुरूवात केली. कर्णधार एलिसा हिली आणि बेथ मुनी या दोघींनी मोठी भागीदारी रचली. पहिल्या विकेटसाठी दोघींनी 85 धावांची भागीदारी केली. येथेच भारतीय संघाचा पराभव निश्चित झाला होता. एलिसी हिलीने 55 तर बेथ मुनी हिने 52 धावांची खेळी केली.

आधी फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने मोठी धावसंख्या उभारण्याचे  ठरवले होते. परंतु, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज फार काही करू शकले नाहीत. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या जोडीने 39 धावांची भागीदारी केली. 60 ते 66 दरम्यान धावसंख्या असताना तीन फलंदाज बाद झाले होते. यानंतर मात्र अन्य फलंदाजांनी वेगवान खेळ केला नाही. त्यामुळे कशातरी 147 धावा करता आल्या. हे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाच्या महिला फलंदाजांनी अगदी सहज पार केले.

INDW vs AUSW : भारताला डबल धक्का! महिला संघाचाही ऑस्ट्रेलियाकडून पराभव

दरम्यान,  एकदिवसीय मालिकेत सलग दोन पराभव झाल्यानंतर भारताने मालिका गमावली होती. अखेरच्या सामन्यात फक्त तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघानी ऑस्ट्रेलियाला जोरदार टक्कर दिली पण ही झुंज अपयशी ठरली. अवघ्या तीन धावांनी संघाचा पराभव झाला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील भारताचा हा सलग दुसरा पराभव होता. या पराभवाबरोबरच भारताने मालिकाही गमावली. यानंतर टी 20 सामन्यांची मालिकाही गमावण्याची नामुष्की भारतीय संघावर ओढवली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube