Ind VS Pakistan : आशिय चषकातील भारत पाकिस्तान सामन्यात भारताने (India Vs Pakistan) पुन्हा पाकिस्तानला लोळवलंय. सुपरफोर सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा विकेट्सने धुव्वा उडावला आहे. आशिया चषकातील भारताचा पाकिस्तानवर हा दुसरा विजय असून सामन्यामध्ये पाकिस्तानने भारतासमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलच्या जोरदार फलंदाजीवर भारताने हे लक्ष्य आरामात गाठलं. या सामन्यात भारताचा फलंदाज अभिषेकने 39 चेंडूमध्ये 6 चौकार आणि 5 षटकारांसह 74 धावा केल्या आहेत. तर शुभमनने 47 धावा करीत टीमला योगदान दिलंय. दोघांच्या 105 धावांच्या भागीदारीमुळे भारताचा पाया भक्कम झाला. त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्माने विजय खेचून आणला.
𝗔 𝗰𝗹𝗶𝗻𝗶𝗰𝗮𝗹 𝘄𝗶𝗻 𝗶𝗻 𝘁𝗵𝗲 𝗯𝗮𝗴 𝗶𝗻 #𝗦𝘂𝗽𝗲𝗿𝟰! 🙌#TeamIndia continue their winning run in the #AsiaCup2025! 👏 👏
Scoreboard ▶️ https://t.co/CNzDX2HKll pic.twitter.com/mdQrfgFdRS
— BCCI (@BCCI) September 21, 2025
पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि फखर जमान यांनी सलामीला मैदानात पाऊल टाकलं. दोघांनीही सुरुवातीला आक्रमक खेळ दाखवत तुफानी फटकेबाजी सुरू केली. पण हार्दिक पांड्याने फखरला परत पाठवलं. तो 9 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. यानंतर साहिबजादा फरहान आणि सईम अयूब यांनी दुसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 72 धावांची भागीदारी करत पाकिस्तानचा डाव सावरला.
मी ब्राह्मण, परमेश्वराचे मोठे उपकार आम्हाला आरक्षण नाही, नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य
दरम्यान, कालच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानानने प्रथम फलंदाजी करत 172 धावांचं लक्ष्य दिलं. गेल्या रविवारी, 14 सप्टेंबर रोजी जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले तेव्हा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सात विकेट्सनी शानदार विजय मिळवला.
सलमान खानच्या कमिटमेंटची कमाल! थंडी-दुखापतीवर मात करून पूर्ण केलं ‘बॅटल ऑफ गलवान’चं पहिलं शेड्यूल
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानकडून फखर झमान आणि फरहानने डावाची सुरुवात केली. अभिषेक शर्माने पहिल्याच षटकात फरहानचा सोपा झेल सोडला. पाकिस्तानने पहिल्याच षटकात 6 धावा केल्या. पण जेव्हा हार्दिकने त्याचे दुसरे आणि सामन्यातील तिसरे षटक टाकले तेव्हा त्याने फखर झमानला बाद केले. फखर 15 धावांवर बाद झाला. संजूने एक शानदार झेल घेतला.