Download App

आफ्रिकेनंतर ऑस्ट्रेलियाही सज्ज; WTC Final साठी ‘या’ 11 खेळाडूंना संधी  

Australia Playing XI WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25  च्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून (Australia) प्लेइंग 11 जाहीर

  • Written By: Last Updated:

Australia Playing XI WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25  च्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून (Australia) प्लेइंग 11 जाहीर करण्यात आली आहे. 11 जूनपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 चा (World Test Championship) अंतिम सामना लॉर्ड्स (Lord’s) येथे सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद पटकावले होते.

ब्यू वेबस्टरला संधी  

बॉर्डर- गावस्कर मालिकेतील शेवटच्या सामन्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सॅम कॉन्स्टासला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतिम सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आलेला नाही. तर दुखापतीतून सावरल्यानंतर अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनचे (Cameron Green) संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) आणि मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) डावाची सुरुवात करणार आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर कॅमेरॉन ग्रीन, चौथ्या क्रमांकावर ट्रॅव्हिस हेड आणि ॲलेक्स कॅरी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार आहे.

बोलंडच्या जागी हेझलवूडला संधी

पॅट कमिन्स वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळेल. याच बरोबर अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क देखील संघात असणार आहे. जोश हेझलवूडच्या पुनरागमनानंतर स्कॉट बोलंडला प्लेइंग 11 मधून वगळण्यात आले आहे. बोलंड भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत हेझलवूडच्या जागी खेळला होता.

सरकारचा मोठा निर्णय; आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, ए.बी. धुळज यांच्याकडे OBC बहुजन कल्याण विभाग 

ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11 :

उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेझलवूड.

follow us