जोहान्सबर्ग : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेला आजपासून दक्षिण आफ्रिकेत रंगणार आहे. (Womens T20 World Cup 2023) यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सलामीची लढत रंगणार आहे. (ICC Women T20 World Cup) या स्पर्धेत १० संघ सहभागी झाले असून १७ दिवसांत एकूण २३ सामने खेळवले जाणार. (T20 World Cup 2023) यंदा ही आठवी विश्वचषक स्पर्धा राहणार आहे. भारतीय महिला संघाने २०२० मध्ये सातव्या विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली, पण ऑस्ट्रेलियाने तो सामना जिंकून विजेतेपदावर कब्जा केला. यामुळे टीम इंडियाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागणार आहे.
विश्वचषकाचे सामने केपटाऊनमधील न्यूलँडस् ग्राऊंड, पार्लमधील बोलँड पार्क आणि पोर्ट एलिझाबेथ येथील सेंट जॉर्ज पार्क येथे खेळवले जाणार आहे. पहिला सामना यजमान द. आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात केपटाऊनमध्ये आज खेळवला जाणार आहे. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना २३ फेब्रुवारी, तर दुसरा उपांत्य सामना २४ फेब्रुवारीला होणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना २६ फेब्रुवारीला केपटाऊन येथील न्यूलँडस् मैदानावर खेळवला जाणार आहे. आयसीसीने २७ फेब्रुवारी ही तारीख अंतिम सामन्यासाठी राखून ठेवली.
या स्पर्धेत सहभागी होणार्या १० संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली. गट ‘अ’ मध्ये द. आफ्रिकेसह ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगला देश आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. तर ‘ब’ गटात भारत, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचा समावेश करण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचे सर्वाधिक ५ वेळा विजेतेपद पटकावले. कांगारू संघ २०१०, २०१२, २०१४, २०१८आणि २०२० मध्ये चॅम्पियन बनला. २००९ मध्ये इंग्लंड आणि २०१६ मध्ये वेस्ट इंडिज विजेते ठरले.
भारताचे सामने : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार्या टीम इंडियाचा पहिला सामना १२ फेब्रुवारी दिवशी केपटाऊनमध्ये पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे. १५ फेब्रुवारीला या मैदानावरच वेस्ट इंडिजशी लढत होणार आहे. तर १८ आणि २० फेब्रुवारीला पोर्ट एलिझाबेथ येथे अनुक्रमे इंग्लंड आणि आयर्लंड यांच्याशी सामने होणार आहेत. टीम इंडियाचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:३० वाजल्यापासून सुरू होणार आहेत.
भारत ३ वेळा सेमीफायनलमध्ये : भारताने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ७ टी-२० विश्वचषकांमध्ये ३ वेळा उपांत्य फेरीत आणि एकदा अंतिम फेरीत प्रवेश केला. टीम इंडिया २००९, २०१० आणि २०१८ मध्ये सेमीफायनल खेळली. त्यावेळी २०२० विश्वचषकात अंतिम सामना खेळवण्यात आला.