Download App

IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियानं भारतात विजयाची गुढी उभारली; मालिका 2-1 ने जिंकली

चेन्नई : भारत (India)आणि ऑस्ट्रेलिया (Australia)यांच्यातील तीन एकदिवसीय (Three ODIs Series)सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज बुधवारी खेळवला. चेन्नईतील (Chennai) चेपॉक मैदानावर तिसरा सामना झाला. हा सामना ऑस्ट्रेलियानं आपल्या नावावर केला आहे. त्याचबरोबर ही मालिकाही जिंकली आहे. एकप्रकारे ऑस्ट्रेलियानं आज भारतात आपल्या विजयाची गुढी उभारली आहे.

सुरुवातीलाच नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने (Steve Smith)प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या सामन्यात 270 धावांचं मोठं लक्ष्य दिलं होतं. ते गाठताना भारतीय क्रिकेट संघाची दमछाक झाली. भारतीय संघाला त्यावर फक्त 248 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळं भारताचा या सामन्यात 21 धावांनी पराभव झाला. आता ऑस्ट्रेलियानं फक्त हा सामनाच जिंकला नाहीतर ही तीन सामन्यांची मालिकाही आपल्या खिशात घातली आहे.

तुला मुख्यमंत्री व्हायचे हो पण, माझे..; राज ठाकरेंनी सांगितला उद्धव ठाकरेंचा किस्सा

ऑस्ट्रेलिया सुरुवातीलाच ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श जोडीने पाहुण्यांना चांगली सुरूवात करुन दिली होती. त्यांनी 10 षटकांच्या आत 68 धावापर्यंत केल्या. पण ट्रेव्हिस हेड (33), मिचेल मार्श (47) दोघांना हार्दिकने बाद केले. पाठोपाठ स्टीव्ह स्मिथलाही त्याने शून्यावर माघारी पाठवले. नंतर कुलदीप यादवने डेव्हिड वॉर्नर 23 तर आणि मार्नस लाबूशेन 28धावांवर बाद झाला.

अलेक्स कॅरीच्या 38 आणि मार्कस स्टॉयनीसच्या 25 धावांमुळे ऑस्ट्रेलियाने द्विशतकी मजल मारली. अखेर अबोटच्या 26, अगारच्या 17, मिचेल स्टार्कच्या 10 आणि अडम झम्पाच्या नाबाद 10 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 269 धावा केल्या. भारताकडून हार्दिक, कुलदीपने 3-3 तर सिराज, अक्षरने 2-2 बळी टिपले.

भारतीय संघात, रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्यात चांगली भागीदारी होत होती. पण रोहित शर्मा 30 धावांवर कॅचआऊट झाला. शुबमन गिल 37 धावांवर LBW झाला तर केएल राहुल 32 धावांवर बाद झाला. अक्षर पटेल 2 धावांवर माघारी परतला. विराट कोहलीने झुंजार अर्धशतक ठोकत 72 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार खेचत 54 धावांची खेळी केली.

त्यातच सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाला. हार्दिक पांड्याने झुंज देत 40 धावा केल्या. जाडेजानेही त्याला साथ देत 18 धावा केल्या. पण हे दोघेही मोठा फटका खेळताना बाद झाले.

Tags

follow us