Download App

ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा कोरलं विश्वचषकावर नाव

केपटाऊन : महिला T20 विश्वचषक (Womens T20 WC) 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 19 धावांनी मात देत ऑस्ट्रेलियन महिलांनी विश्वचषक मिळवला आहे. विशेष म्हणजे सहाव्यांदा विश्चषकावर ऑस्ट्रेलियन महिलांनी नाव कोरलं आहे. टॉस जिंकत ऑस्ट्रेलियन महिलांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चांगली गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 156 धावांवर रोखले.

ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनी हिने एकहाती झुंज देत नाबाद 74 धावा करत संघाची धावसंख्या 156 धावांपर्यंत पोहोचवली. आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 120 चेंडूत 157 धावा करायच्या आहेत. तर आफ्रिकेच्या शबनम इस्माईल आणि मारिझने कॅप यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

संजय जाधव दिग्दर्शित ‘कलावती’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित, अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत

सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन महिलांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सेमीफायनलप्रमाणे एक दमदार लक्ष्य प्रतिस्पर्धी संघासमोर ठेवायचं त्यांचं लक्ष्य होतं. ज्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चांगली गोलंदाजी केली, पण ऑस्ट्रेलियाची अनुभवी फलंदाज बेथ मूनी हिने एकहाती झुंज देत नाबाद 74 धावा केल्या. एलिल हेलीने 18 तर गार्डनरने 29 धावा केल्या. पण बेथ मूनी अखेरपर्यंत क्रिजवर टिकून राहिल्याने ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 150 पार पोहोचली. कागांरुनी 156 धावा स्कोरबोर्डवर लावत 157 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेला दिले.

दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वोल्वार्ड हिने 61 धावांनी एकहाती झुंज दिली. पण तिला इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने अखेर 137 धावाच दक्षिण आफ्रिकेचा संघ करु शकला. ज्यामुळे 19 धावांनी ऑस्ट्रेलियाने सामना आणि विश्वचषक जिंकला.

Tags

follow us