Babar Azam : पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझमला (Babar Azam) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मोठा धक्का देत पाकिस्तानच्या कसोटी संघातून डच्चू दिला आहे. इंग्लंड सुरु असणाऱ्या तीन कसोटी सामन्यातील मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी पाकिस्तानच्या संघात बाबर आझमची निवड करण्यात आलेली नाही.
पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर पीसीबीच्या निवड समितीने मोठा निर्णय घेत बाबर आझमसह स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) आणि नसीम शाहला (Naseem Shah) देखील पुढील दोन कसोटी सामन्यांसाठी संघातून डच्चू देण्यात आला आहे. याच बरोबर पीसीबीच्या निवड समितीने यष्टीरक्षक फलंदाज आणि माजी कर्णधार सर्फराज अहमदलाही संघात स्थान दिलेला नाही.
🚨 Pakistan name squad for second and third Tests against England 🚨#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/EHS9m84TXK
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 13, 2024
निवड समितीने स्टार फलंदाज बाबर आझमच्या जागी साजिद खानला पाकिस्तानच्या कसोटी संघात संधी दिली आहे. साजिद खानने जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी येथे शेवटचा कसोटी सामना खेळाला होता. तर डावखुरा फिरकी गोलंदाज मेहरान मुमताजचा देखील पाकिस्तानच्या संघात पुढील दोन कसोटी सामन्यांसाठी समावेश करण्यात आला आहे.
मेहरान मुमताजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 54 विकेट्स घेतल्या आहेत. याच बरोबर संघात हसिबुल्ला खानचाही समावेश करण्यात आला आहे. त्याने 21 प्रथम श्रेणी सामन्यांत 923 धावा केल्या आहेत ज्यात 4 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
अजित पवारांनंतर भाजपलाही धक्का, माजी आमदाराचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश
दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तान संघ
शान मसूद (कर्णधार), सौद शकील, आमेर जमाल, अब्दुल्ला शफीक, हसिबुल्लाह (यष्टीरक्षक), कामरान गुलाम, मेहरान मुमताज, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, सैमी अयुब, नोमान अली, साजिद खान आणि जाहिद मेहमूद.